💥प्रसिद्ध हवामान (तज्ञ) अभ्यासक पंजाबराव डख पाटील यांना शासनाचा "महाराष्ट्र भुषण" पुरस्कार देण्यात यावा....!


💥कृषीमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन बोंद्रे यांची मागणी💥 


✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा/चिखली (18 आक्टोंबर) : गेल्या  दीड दशकापासून शेतकऱ्यांना हवामान व पावसाच्या संदर्भातील विनामूल्य मार्गदर्शन हवामान अभ्यासक पंजाबराव डख पाटील रा.गुगळी धामणगाव ता.सेलू,जिल्हा परभणी हे विविध सोशल मीडियाच्या माध्यमा द्वारे भ्रमणध्वनीच्या मेसेजच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत आले आहे शेती-मातीशी कटिबद्ध असणारा शेतकरी त्यांच्या पावसाच्या अंदाजाने सुखावला आहे. निश्चित पर्जन्याची वेळ तथा अवकाळी पावसाचा संदर्भात पंजाबराव डख हे मोबाईल द्वारे मेसेज द्वारे तथा सोशल मीडिया व विविध माध्यमांच्या द्वारे दररोज महाराष्ट्रातील करोडो शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन माहिती देत आहेत. 


मागील काही वर्षापासून पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाज वेधशाळेप्रमाणे अचूक ठरत आहेत. यामुळे सोयाबीन-कांदा-द्राक्ष-डांळीब -बागायतदार विविध पिके घेणारे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव यांचे वेळीअवेळी होणारे नुकसान टळले आहे तसेच त्यांच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न  देखील अनेक वाढले आहे  पंजाबराव ढग यांचे शेतकरी हिताविषयीचे मार्गदर्शनपर कार्यक्रम  विनामूल्य महाराष्ट्रात नेहमी सुरू असतात त्यांनी आपल्या आयुष्याचा संपूर्ण वेळ शेतकऱ्यांसाठी वाहून घेतला असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत गेल्या दशकातील शेती माती  विषयीचा त्यांचा अभ्यास  त्यांचे कौशल्य विषयक योगदान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाचा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार  पंजाबराव डख यांना देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कृषीमित्र -सचिन बोंद्रे यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे कृषीमित्र मा.नगरसेवक सचिन बोंद्रे यांच्या कडून,  सलग दुसऱ्यांदा करण्यात आलेली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे  यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. सदर बाबीकडे वेळीच लक्ष देऊन शासनाने शेतकऱ्याच्या खऱ्या मित्राला "महाराष्ट्र भूषण# पुरस्कार देऊन गौरवित करावे असे सदर निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी कृ.ऊ.बा.स.माजी सभापती डॉक्टर सत्येंद्र भुसारी, सचिन शिंगणे,किसानसेल तालुका अध्यक्ष समाधान गीते, प्रगतशील शेतकरी रामभाऊ जाधव, काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख अमोलजी सुरडकर,विष्णू फेपाळे यांचे सह शेतकरी बांधव उपस्थित होते..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या