💥माजी.आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वात जिंतूर-औंढा महामार्गावर भव्य रस्ता रोको संपन्न....!


💥रस्ता तात्काळ दुरुस्ती व नवीन रस्ता करण्यासाठी भव्य रस्ता रोको करण्यात आला💥

 जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर 

मा.आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वात जिंतूर औंढा महामार्गावर भोगाव ता.जिंतूर या ठिकाणी रस्ता तात्काळ दुरुस्ती व नवीन रस्ता करण्यासाठी  भव्य रस्ता रोको करण्यात आला.

जिंतूर महामार्ग रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून जिंतूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२ जिंतूर ते औंढा (नागनाथ) ता. जिंतूर जि. परभणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून मागच्या एक वर्षापासून या रस्त्यावर दोन-तीन फुटांचे मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे  अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. संबधित अधिकाऱ्यांना या रस्त्या बाबत वेळोवेळी विनंती तसेच विचारणा केली असता त्यांच्या कडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या महामार्गावर दररोज होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे असून बऱ्याच नागरिकांचा त्यात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच रोडवर होणाऱ्या  अपघातामुळे बऱ्याच नागरिकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या रोडवर होणारी वाहतूक व अपघातांचे प्रमाण लक्षात घेता या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.ई. मागणीसाठी मा.आ.विजयराव भांबळे यांनी भोगाव ता. जिंतूर याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शकडो कार्यकर्त्यांसह भव्य रास्ता रोको केला. 

यावेळी बोलतांना मा.आ.विजयराव भांबळे यांनी सांगितले कि, केंद्रात व राज्यात भाजप चे सरकार असून भाजप सरकार रस्त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. जिंतूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून भाजप च्या विद्यमान आमदार या सदर गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्यावर झालेल्या अपघाताचा कलम ३०२ नुसार गुन्हा विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वर दाखल करायचा का असा सवाल उपस्थित केला. तसेच या वर्षी अतिवृष्टी मध्ये जिंतूर व सेलू दोन्ही तालुके वगळण्यात आले. पिकविमा मध्ये  देखील जिंतूर व सेलू दोन्ही तालुके वगळण्यात आले. महावितरणचे सर्वे कामे बंद आहेत.ग्रामीण भागात बेघर लोकांना घरकुल मिळाले नाहीत. सदर महामार्ग तात्काळ दुरुस्त व नवीन रस्ता न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.  

यावेळी प्रसादराव बुधवंत,रामराव उबाळे,अभिनय राऊत ,विठ्ठल घोगरे,विजय वाकळे,गणेशराव ईलग,मधुकर भवाळे, प्रकाश शेवाळे,विजय खिस्ते,संतोष भवाळ, प्रकाश शेवाळे,किरण तळेकर,मुंजाभाऊ, तळेकर,शंकर जाधव,बालाजी सांगळे,पिंटू मस्के,हरिभाऊ बुधवंत,संजय  निकाळजे,चंद्रकांत बहिरट,शाहेदबेग मिर्झा, बाळासाहेब देशमुख,लखुजी जाधव,आनंतराव देशमुख,अन्सिराम पुंड,योगेश देशमुख,विठ्ठल देशमुख,रवी देशमुख,नारायण देशमुख,अंगत देशमुख,सुधाकर मस्के,हकीम लाला,शौकत लाला,मकसूद पठाण, आकु लाला,बाळू दाभाडे, यांच्यासह अनेक गावातील सरपंच व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या