💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका.....!


💥आमदार संजय सिरसाठ यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत आणून लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय💥

 ✍️मोहन चौकेकर 

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर संजय शिरसाट यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत आणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. 

आमदार संजय शिरसाट यांना काल (सोमवार 17 ऑक्टोबर 2022) हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे काल दुपारपासून आमदार संजय शिरसाट यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज (मंगळवार 18 ऑक्टोबर 2022) सकाळी शिरसाट यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत आणून लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. 

संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आमदारकीची ही तिसरी टर्म सुरू आहे. ते सलग तीन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. संजय शिरसाट 2009, 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. राजकारणात येण्याआधी ते रिक्षा चालवत होते. संजय शिरसाट यांनी 1985 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण सुरू केले. ते 2000 मध्ये नगरसेवक झाले आणि 2003 मध्ये स्थायी समितीचे सभापती झाले. नंतर 2005 मध्ये पुन्हा नगरसेवक झाले आणि 2009 पासून आमदार आहेत. 

संजय सिरसाठ यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आमदार संजय शिरसाट यांना मुंबईत लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार असल्याचे समजते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या