💥पुर्णा येथील वाल्मिकी नगर (व्यंकटी प्लॉट) परिसरात महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त महाआरती संपन्न....!


💥यावेळी अखिल भारतीय वाल्मिकी महासभा जिल्हाध्यक्ष विजयकुमार सौदा यांची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.११ आक्टोंबर) - शहरातील वाल्मिकी नगर (व्यंकटी प्लॉट) परिसरात आज मंगळवार दि.११ आक्टोंबर २०२२ रोजी आद्य कवी तथा श्रीमद् रामायन रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती  निमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी या जयंती महोत्सव व भव्य महाआरतीस वाल्लिकी आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुमीत भैया चावरे,वाल्मिकी आर्मी परभणी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मनोजजी सौदा यांची विशेष उपस्थिती होती तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये अखिल भारतीय वाल्मिकी महासभा परभणी जिल्हाध्यक्ष विजयकुमारजी सौदा,समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामपालजी सौदा,सामाजिक कार्यकर्ते ओमपालजी बोहत,विक्रमजी पोहाल यांच्यासह समस्त समाज बांधव उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या