💥परभणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांच्या अजब फर्मानाचा जाहिर निषेध...!


💥नागरिकांसह प्रतिष्ठातांना कामासाठी भेटण्यास आठ दिवसातून एक दिवस केवळ एक तास असा काढला फर्माण प्रहारने केले निषेध💥

परभणी : परभणी शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकाचा पदभार काही दिवसापुर्वीच स्विकारलेल्या श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी महानगरपालिकेमध्ये सध्या लोकप्रतिनिधिंचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे संपूर्ण महानगरपालिकेचा कार्यभार आयुक्त या नात्याने प्रशासक म्हणून देखील श्रीमती सांडभोर मॅडम यांच्याकडे कारभार सोपविण्यात आला. कार्यकाळ संपल्याने लोकप्रतिनिधी महानगरपालिकेत नाहीत त्यामुळे सामान्य जनतेला स्वतःचे म्हणने मांडण्यासाठी, तक्रार निवारण करण्यासाठी व महानगरपालिकेतील महत्वाच्या कामांसाठी प्रशासक म्हणुन आयुक्त मॅडम यांची भेट घ्यावी लागते परंतु आयुक्त मॅडम यांनी काही दिवसापुर्वी एक अजब फर्मान काढत परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील लोकांच्या तक्रारी व म्हणणे ऐकुन घेण्यासाठी भेटीचा वेळ निश्चित केला असुन आठवडयातून एक दिवस म्हणजेच गुरुवारी दु. ३.०० ते ४.०० या वेळेत फक्त एक तासासाठी जनतेने मा. आयुक्त मॅडम यांना भेटावे असा अजब व तुगलकी फर्मान काढला आहे या बाबत महानगर पालिका प्रशासनाने अंमलबजावणी देखील सुरु केली आहे.

महानगरपालिकेतील लोक प्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने तिथे लोकनियुक्त लोकप्रनिधी नसल्याने जनतेला आपल्या अडीअडचणी व तक्रारींच्या निवारणासाठी प्रशासक असलेल्या मा. आयुक्त मॅडम यांना भेटावे लागते. भारतीय प्रशासकीय सेवेत असलेल्या (IAS) अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा फर्मान काढणे अत्यंत चुकीचे आहे. एकीकडे परभणी शहर महानगरपालिका शहरातील नागरीकांना नागरी सुविधा देण्यामध्ये पुर्णतः अपयशी ठरलेले असुन शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य झाले आहे. शहरातील अनेक वस्त्या व कॉलनीमधील रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे व या भागामध्ये घंटा गाडी जात नाही. त्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. त्याच बरोबर नळाला १५ दिवसातुन एक वेळ पिण्याचे पाणी येते. असे एक न अनेक पातळयांवर शहरातील नागरिकांना नगरी सुविधा देण्यात पुर्णपणे अपयशी ठरलेल्या परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणुन श्रीमती सांडभोर मॅडम यांनी पुढाकार घेऊन शहरातील नागरीकांशी सुसंवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी समजुन घेऊन त्यांना चांगल्या नागरी सुविधा देणे अपेक्षित होते परंतु स्वतःला सामान्य जनतेपासून अलिप्त करत आठवडयातुन एक दिवस व तो ही एका तासासाठी सामान्य जनतेला भेटण्यासाठी देणे हा प्रकार संतापजनक असुन प्रहार जनशक्ती पक्ष महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती तृप्ती सांडभोर यांच्या कार्य प्रणालीचा तिव्र शब्दात निषेध करत आहे. श्रीमती तृप्ती सांडभोर मॅडम यांनी भेटीबाबतचे तुघलकी फर्मान तात्काळ मागे घेऊन दररोज किमान २ ते ३ तासाचा कालावधी हा जनतेच्या भेटी साठी निश्चित करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या