💥पुर्णा शहरातील जागृत राष्ट्रवादी मतदार नगर परिषदेच्या सत्तेची सुत्र पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सोपवणार...!


💥राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम यांचे प्रतिपादन💥

पुर्णा शहरासह तालुक्यातील जागृत मतदार सदैव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे वेळोवेळी खंबीरपणे उभा राहिला असल्याचा इतिहास आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दबंग नुतन शहराध्यक्ष प्रताप कदम यांनी केले अजित न्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहीनीशी संवाद साधतांना ते पुढे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर परिषदांच्या निवणूकांमध्ये वेळोवेळी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच पसंती दिली आहे त्यामुळे मागील काळात एरंडेश्वर जिल्हा परिषद सर्कल मधून गौर जिल्हा परिषद सर्कल मधून ताडकळस जिल्हा परिषद सर्कल मधून मतदारांनी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनाच पसंती दिलेली आहे.


पुर्णा नगर परिषद निवडणूकीत देखील वेळोवेळी शहरातील जागृत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेष्ठ नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व राज्याचे माजी उपमुख्यंत्री तथा विद्यमान विरोधीपक्ष नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर अपार विश्वास व्यक्त करीत नगराध्यक्ष पदावर प्रथमतः जनमतातून भुतपुर्व नगराध्यक्ष मोहनराव मोरे,मा.नगराध्यक्ष जाकीर कुरेशी,मा.नगराध्यक्षा आबेदा बेगम खलील कुरेशी यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सत्तेची सुत्र सोपवली होती.

मागील २०१६ यावर्षी पूर्णा नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हाजी खलील खुरेशी,शमीम बेगम चांद बागवान,गणपत बाजीराव घोरपडे,जाकीर रहिममोद्दीन खुरेशी,सुमन मधुकर गायकवाड,शमीम बेगम शेख शरीफ,विरेश भोजराज कसबे,मन्ना बी शेख बशीर हे आठ नगर सेवक शहरवासीयांनी निवडून दिले होते तर स्विकृत सदस्य म्हणून नाहिद अंजुम शेख अमजद यांची निवड झाली होती त्यामुळे शहरातील जागृत मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे निदर्शनास येते त्यामुळे आगामी होणाऱ्या नगर परिषद निवडणूकी शहरातील जागृत राष्ट्रवादी मतदार नगर परिषदेच्या सत्तेची सुत्र एकहाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सोपवणार यात तिळमात्र शंका नसल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या