💥परभणीत नफरत छोडो भारत जोडो यात्रे संदर्भात बैठक संपन्न....!


💥येत्या ७ नोव्हेंबर रोजी आगमन होणाऱ्या यात्रे संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते💥

परभणी : येथील हॉटेल आतीथी स्टेडियम कॉम्प्लेक्स 'नफरत छोडो भारत जोडो' या संदर्भात सुभाष लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते 'नफरत छोडो,संविधान बचाओ 'या राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो ' यात्रेच्या समर्थनार्थ परभणी मध्ये येत्या ७ नोव्हेंबर रोजी आगमन होणाऱ्या यात्रे संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। 

या बैठकीमध्ये परभणी येथे भव्य पदयात्रा करत सभा काढण्या साठीचे नियोजन ठरवण्यात आलेले आहे व यासंबंधी प्रमुख लोकांची कमिटी तयार करण्यात आलेली आहे यामध्ये की काँग्रेस राजन क्षीरसागर , अनिताताई सरोदे , शेख इर्शाद , नदीम इनामदार,मिठू भाई यांचा सहभाग आहे.

या बैठकीत पुरोगामी संघटना चे प्रमुख पदाधिकारी , काँग्रेस चे  पदाधिकारी , जन आंदोलन संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस चे नेते  राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा निघालेली आहे या यात्रेला देशभरातील अनेक जन संघटनांनी जनआंदोलकांनी व पुरोगामी विचारवंतांनी पाठिंबा दिलेला आहे.

ही यात्रा येत्या ८ नोव्हेंबर ला महाराष्ट्रात प्रवेश करणारा असून या यात्रेला संबंध देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वराज अभियान च्या पुढाकाराने व जनंदोलन संघटनांच्या सहकार्यातून कोल्हापूर येथून 'नफरत छोडो , संविधान बचाव ' ही यात्रा येत्या २ नोव्हेंबर पासून काढण्यात येणार आहे । ही यात्रा

७ नोव्हेंबर रोजी परभणी येथे येणाऱआहे , सदरील यात्रा २ तारखेस कोल्हापूर हून निघून वेगवेगळ्या जिल्ह्यातून येते आहे.९ नोव्हेंबर रोजी देगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे होणारी शेतकरी - शेतमजूर व असंघटित कष्टकरी परिषद चे ही आयोजन करण्यात आले आहे। 

आज झालेल्या बैठकीत स्वराज इंडिया पार्टीचे सुभाष लोमटे , कॉम्रेड राजन क्षीरसागर , डॉ सुनिल जाधव , काँग्रेस चे नेते नदीम इनामदार , कॉम्रेड कीर्तीकुमार बुरांडे,जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया चे गोविंद गिरी , स्वराज इंडिया चे गोविंद कामटे,एन.आय.काळे, शेख अजहर साजिद बेलदार ,अमोल लांडगे,मिठू भाई, रफीक शेख,जयश्री पुंडगे , उषा पाचंगे , आदी सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या