💥बहुजन चळवळीतील धाडसी नेतृत्व आक्रमक नेता मास्टर अनिल कांबळे यांचा वाढदिवस मराठवाड्यात सर्वत्र उत्साहात साजरा....!


💥युवासेनेचे शहरप्रमुख कुणाल जाधव यांनी अनिल कांबळे यांच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 45 किलोचा घातला हार💥


मास्टर अनिल रामभाऊ कांबळे यांचा वाढदिवस थाटात संपन्न मराठवाड्यात मास्टर के के या नावाने प्रसिध्द असलेले सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे नामवंत क्रिडाशिक्षक व एक उभरते युवा नेतृत्व मराठवाड्यातील  बहुजन चळवळीचा एक आक्रमक नेता म्हणून  यांना महाराष्ट्र ओळखतो अशा मास्टर अनिल कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला औरंगाबाद येथील मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने व नागसेन मित्र मंडळाच्या वतीने आणि मित्रांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवसाचा  साजरा केला तर जालना येथे रेखाताई तौर पाटील यांनी शासकीय महिला रुग्णालयात रुग्णांना फळ वाटून व गरिबांना अन्नदान करून साजरा केला  तर युवासेनेचे शहरप्रमुख कुणाल जाधव यांनी मस्त अनिल कांबळे यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्ताने 45 किलोचा हार घालून  शासकीय विश्रामगृह जालना येथे साजरा केला.

 तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ओबीसी नेते प्राध्यापक कपिल दहेकर ज्यांनी अंबड चौफुली येथे आतिषबाजी व शाल श्रीफळ देऊन वाढ दिवस साजरा केला त्याचबरोबर रांजणी येथे वंचित आघाडीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष शफिक आतार राष्ट्रवादीचे नेते रमण जाधव युवा नेते किरण जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला तर परतुर येथे काँग्रेस नेते सनी गायकवाड व काँग्रेसच्या सर्व टीमने  व कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोशात मास्टर केके यांचा वाढदिवस साजरा केला तर परभणी येथे साप्ताहिक प्रचेत मेल चे संपादक व वंचित आघाडीचे जिल्ह्याचे नेते डॉक्टर प्रवीण खरात डॉक्टर यांनी बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष दीपक खंदारे व सर्व कर्मचाऱ्यानी हार शाल व शिरफळ देऊन मास्टर केके यांचा वाढदिवस साजरा केला, तर परभणी महापालिकेचे माजी नगरसेवक आकाश लहाने काँग्रेसचे नेते सुधीर कांबळे धीरज कांबळे युवा नेते मिलिंद बामणीकर यांनी देखील मास्टर केके यांचा फटाक्यांची आतिषबाजी करत शाल शिरफळ व केक कापून यांचा वाढदिवस साजरा केला.


पूर्णा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार स्वागत करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून हजारो कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात  मास्टर केके यांचा वाढदिवस साजरा केला, त्याचबरोबर छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून   शेकडो कार्यकर्त्यांनी मास्टर अनिल कांबळे यांचा हार शाल श्रीफळ देऊन केक कापून शुभेच्छांचा वर्षाव केला ,महात्मा बसवेश्वर महाराज चौकातही कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी नांदेड येथील भीमशक्तीचे राज्य संघटक कुमार कुरतडीकर औरंगाबादचे काँग्रेसचे नेते कुणाल कदम वंचित आघाडीचे जिल्हाप्रमुख तुषार गायकवाड शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल  कदम सम्राट अशोक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय पर्वते सुनील खंदारे पाटील बाळासाहेब राऊत यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आयोजन जनजागृती सेनेचे अध्यक्ष अनिल नरवाडे व पूर्णा चे युवा नेते सोनू भाऊ कांबळे यांनी केले होते....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या