💥अंधेरी पोटनिवडणुकीतील ऋतुजा लटके व मुरजी पटेल या दोन्ही उमेदवारांची संपत्ती जाहीर....!


💥दोन्ही उमेदरांच्या संपत्ती आणि शिक्षणात मोठा फरक💥

 ✍️ मोहन चौकेकर

अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणुक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात ही लढत होणार आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 14) उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.यावेळी निवडणुक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन्ही उमेदवारांनी आपली संपत्ती आणि शिक्षणाची माहिती दिली आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट्याच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याकडे 43 लाख 89 हजार 504 रुपयांची संपत्ती आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या 12.35 एक्कर जमीन आहे. त्यांच्याकडे केवळ 75 हजार रुपये रोख रक्कम आहे. लटकेंच्या नावावर 15 लाख 29 हजार रुपये गृहकर्ज आहे.तर 51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचे स्व. पती रमेश लटके यांच्या नावावरील संपत्ती ऋतुजा लटके यांच्या नावावर अद्याप आलेली नाही. प्रतित्रातील माहितीनुसार लटके यांचे शिक्षण पदवीधर आहे.

दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याकडे 10 कोटी 41 लाख रुपयांची संपत्ती आहे. यातील 5 कोटी 41 लाख रुपये हे मुरजी यांच्या नावावर असून त्यांच्या मुलाच्या नावावर 5 कोटी आहेत. त्याचबरोबर पटेल याची गुजरातमधील कच्छ येते 30 एकर जमीन असून मुंबईत तीन सदनीका आहेत. पटेल यांचे शिक्षण नववी झाले आहे.

दरम्यान, भाजप आणि उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज दोन्ही पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला. दोन्ही उमेदवार मतदार संघात फिरून मतदारांचा आशिर्वाद घेत आहे. तसेच आम्हीच विजयी होणार असे दोघांकडूनही सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या