💥परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केली सेलू व जिंतूर तालूक्यातील गावात ई-पिक पाहणी....!


💥ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी दिल्या💥 


परभणी (दि.18 आक्टोंबर): जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी आज सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ई-पिक पाहणी करण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी केले.


यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सेलू तालूक्यातील वालूर, मोरेगाव, मौ. खुपसा, हातनूर, चिखलठाणा (बु.) रायपूर या शिवारातील तर जिंतूर तालुक्यातील चारठाणा, रायखेडा, चांदज या शिवारातील पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांची ई-पिक ॲपद्वारे पाहणी व नोंद केली. तसेच उपस्थित सरपंच व शेतकरी बांधवाना संपूर्ण गावातील ई-पिक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार सेलू दिनेश झांपले, तहसीलदार जिंतूर सखाराम मांडवगडे, सेलू तालुका कृषि अधिकारी श्री. जोगदंड, जिंतूर तालुका कृषि अधिकारी श्री. काळे यांच्यासह संबंधीत गावातील सरपंच, तलाठी, कृषि सहाय्यक आदींची यावेळी उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या