💥परभणी येथे सामाजिक न्याय विभागाचा ९० वा स्थापना दिवस साजरा.....!


💥यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक आयुक्त गिता गुट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपअभियंता सामाले यांची उपस्थिती💥 

परभणी : येथील आंबेडकर भवन येथे सामाजीक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्या  व जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने शनिवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सामाजीक न्याय विभागाचा ९० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त गिता गुट्टे, प्रमुख पाहुणे उपअभियंता सामाले, अर्चनाताई घनवट, गंगाताई दशरथे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम,कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून शपथ देण्यात आली. सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

 यावेळी बोलताना गंगाताई दशरथे यांनी आर्ट ऑफ लिव्हींग यांनी या संदर्भात तर उपअभियंता सामाले यांनी आनंदी जीवन जगण्या विषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांच्या हस्ते ऊसतोड कामगांराना ओळखपत्र, जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक गायके यांनी केले तर सूत्रसंचलन आर.बी.वजीर यांनी व आभार एस.डी.शिंदे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनकर.बी. जोशी,एम.एम. पेदेवाड,ए.एम.साखरे, तुषार दवने, यांच्यासह समाजकल्याण

जातपडताळणी विभाग व विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी नागरीक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सहाय्यक आयुक्त गुठ्ठे यांनी सामाजीक न्याय विभागाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन समाजकल्याण विभागाच्या योजनांसंदर्भात व कार्यसंदर्भात मार्गदर्शन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या