💥पुर्णा तालुक्यातील माखणी गावात शेतकरी बांधवांच्या शेतावर शिवार फेरी संपन्न...!


💥शिवार फेरीत उपक्रसिल शेतकरी जनार्धन आवरगंड यांच्या आखाड्यावर शेतकरी बांधव भगिनींना मार्गदर्शन💥


पूर्णा (दि.०४ आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील माखणी गावात शेतकरी बांधवांच्या  शेतावर शिवार फेरीत खुप काही अनुभव आले त्यात त्यांच्या व्यथा जानल्यावर वाटते किती अपार कष्ट करतात फळ कमी मिळते मात्र आनंदी राहणे त्यांच्याकडुन शिकावे असे प्रतिपादन डॉ.विणा भालेराव यांनी व्यक्त केले . 

पुर्णा तालुक्यातील माखणी येथे " माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" वंसराव नाइक  म.कृ.विद्यापीठ परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला)  योजनेतील शास्त्रज्ञ मौजे माखणी ता. पूर्णा येथे सहभागी झाले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार माननीय कुलगुरू इंद्र मणि यांच्या सुचनेनूसार आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.


[ शिवार फेरीत उपक्रसिल शेतकरी जनार्धन आवरगंड यांच्या आखाड्यावर मार्गदर्शक व  महीला शेतकरी ]

या उपक्रमा अतर्गत  (ता .03) मौजे माखणी, ता. पूर्णा  या गावातील शेतकऱ्यांच्या  समस्या जाणून घेतल्या.ओंकार ग्रुह ऊद्योग माखणी बळीराजा स्वयम् साह्यता समुह माखणी,ओंकार शेतकरी बचतगट माखणी प्रगतीशील शेतकरी  जनार्दन अवरगंड यांच्या शेतावर महीला  शेतकरी यांची 'मार्गदर्शन उपक्रम'  घेऊन शेतकऱ्यांशी संवाद करत शेतीतील प्रश्न व अडचणी  जाणून घेतल्या. महीला गटातील नव नवीन प्रोजेक्ट तयार करण्यात आलेल्या खाद्य वस्तु  विषयी अध्यक्षा मिरा आवरगंड, सुरेखा आवरगंड यांनी मनोगत व्यक्त केले .

        पुढे बोलतांना  डॉ. तसनिम नाहीद खान यांनी पोषण आहार मिळण्यासाठी आपल्या शेतात रान भाज्यांची लागवड वाढवावी व त्यातून उत्कृष्ट व्यवसाय करता येऊ शकतो असे ही संबोधले. तसेच डॉ. वीणा भालेराव , डॉ. जयश्री रोडगे यांनी महाविद्यालयातील तंत्रज्ञानावर शेतकरी महिलांसाठी विविध श्रम बचतीची साधने या विषयी माहिती देऊन प्रात्यक्षिकही दाखविले.  डॉ. शंकर पुरी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विविध ॲप्स तसेच महाविद्यालयाचा  महिला शेतक-यांसाठी तंत्रज्ञान विशेष ॲप चे उपस्थित शेतकरी महिला व बांधवांमध्ये त्यांच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉलेशन करून त्याची उपयुक्तता पटवून दिली. डॉ. वीणा भालेराव यांनी श्री गोविंद लिंबाजी पौळ, डॉ. जयश्री रोडगे यांनी  माणिक  आवरगंड आणि डॉ. शंकर पुरी यांनी अनुरथ बाळासाहेब आवरगंड यांची शेती विषयक संपूर्ण माहिती संकलित केली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच त्यांना शेती व्यवसायासाठी काही सूचनाही केल्या. यामध्ये प्रामुख्याने शेतीशी जोडधंदे कसे उभारावेत, शेतीमधील श्रम बचत करण्यासाठी विविध उपाय योजना, कुटुंबाचे पोषण उत्कृष्ट ठेवण्यासाठी आणि आपले कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी  अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केले . या कार्यक्रमामधे बचतटातील महिला चा मोठा सहभाग होता.  मिरा आवरगंड, सूरेखा आवरगंड, सरस्वती आवरगंड, मथुराबाई आवरगंड , मजुळाबाई सुर्यवंशी, प्रयागबाई आवरगंड शिवानी आवरगंड , पारुबाई आवरगंड , संताबाई आवरगंड , छाया आवरगंड अदी शेतकरी महिला व बंडु गाडे अनुरथ आवरगंड मानीक आवरगंड गोविंद पौळ आदी शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्धन आवरगंड यांनी केले तर आभार आनुरथ आवरगंड यांनी केले.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या