💥राज्यातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर....!


💥राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये केला दिवाळी बोनस जाहीर💥                                      

✍️ मोहन चौकेकर

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५,००० रुपये बोनस मिळणार आहे. या खर्चापोटी एसटी महामंडळाकडे राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

* रखडलेल्या पगार-भत्यांसाठी ३०० कोटींच्या निधीला मान्यता :-

एसटी महामंडळाचं रखडलेले पगार, विविध सवलत मूल्य आणि रखडलेल्या भत्त्यांसाठी राज्य सरकारनं नुकतीच ३०० कोटींच्या निधीला नव्याने मान्यता दिली. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस-शिंदे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना मासिक वेतनासाठी ठोस मदत होत नसल्याची टीका होत होती, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २०२२-२३ मध्ये सरकारने विविध सवलत मूल्यांपोटी १३८८.५० कोटी शिल्लक तरतुदीमधून ३०० कोटींना ही मान्यता दिली. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार असं सांगितलं जात होतं.

* दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांमध्ये होता असंतोष :-

राज्यात ७ सप्टेंबरला फक्त आगार स्तरावरील एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले होते. तर विभागीय आणि मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी पगारापासून वंचित होते. पगाराची तारीखेचे ५ दिवस उलटूनही पगार मिळत नसल्यानं एसटी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पगारावरून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती. त्यानंतर सरकारनं आज रात्री उशिरापर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, विविध देणी आणि भत्त्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी ३०० कोटींच्या निधीला मान्यता दिल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता.

 ✍️ मोहन चौकेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या