💥राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सोमवारी 'एकता दौड'चे आयोजन....!


💥या उपक्रमाअंतर्गत परभणी येथे दि.३१ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलातून सकाळी एकता दौडला सुरुवात💥

परभणी (दि. 27 आक्टोंबर) : पहिले माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिना निमित्त दि.31 आक्टोंबर 2022 शहरात विशेष दौडचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जिल्हास्तरावर सरदार पटेल यांचा जन्मदिवस हा 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. 'आजादी का अमृत महोत्सव' निमित्ताने मोठ्या स्वरुपात हा दिवस साजरा करण्यासाठी परभणी जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत परभणी येथे सोमवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी ७ वाजता एकता दौडला सुरुवात होणार असून श्री. शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, जनता मार्केट, महात्मा फुले पुतळामार्गे जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, समन्वयक, नेहरु युवा केंद्र व शिक्षण विभाग, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, विद्यापीठ, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयाने याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी-कर्मचारी, संघटनांचे पदधिकारी तसेच खेळाडू आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या