💥इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच भारतीय सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन जणांना काढून टाकले....!


💥टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांनी घेतला टी्टरचा ताबा💥

✍️ मोहन चौकेकर 

                                                                                         टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून तोच शुक्रवारी अधिकृतपणे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा ताबा त्यांनी घेतला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.  या दरम्यान त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल व इतर तीन अधिकाऱ्यांना काढून टाकले आहे, अशी माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी बोली लावल्यानंतर पराग अग्रवाल यांच्याशी त्यांचे मतभेद सुरू होते. त्यानंतर हा करार मध्येच थांबवण्यात आला होता. त्यांनतर आता ट्विटर हाती येताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह इतर काही उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले आहे. 

प्राप्त माहीतीनुसार  इलॉन मस्कने गुरुवारी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलर्सचा करार केला. अग्रवाल, चीफ फायनान्स ऑफिसर (CFO) नेड सेगल आणि कायदेशीर धोरण, विश्वस्त व सुरक्षा विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांच्यासह जनरल काउंसिल सीन एजेट यांनाही गुरुवारी (ता. 27 ऑक्टो.) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.  इलाॅन मस्क यांनी नुकताच आपल्या ट्विटर बायोमध्ये Chief Twit आणि Twitter HQ असा बदल केला आहे.

दरम्यान अनेक दिवसांचा वेळ गेल्यानंतर इलॉन मस्क यांनी काल सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटरच्या हेडक्वार्टर मध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी मंगळवारी त्यांनी निधी उपलब्ध व्हावा यासाठी बँकर्ससोबत मीटिंग घेतली. आता बँकांनी अंतिम क्रेडिट करार पूर्ण केला आहे. आता डेलावेअर चॅन्सरी कोर्टाने त्यांना ट्विटर खरेदीचा करार आज 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यास सांगितलं  होते....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या