💥प्राचार्य निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व विर सावरकर नगर मंडळातर्फे आयोजित गरब्यास प्रचंड प्रतिसाद....!


💥तरुण तरुणाईसह समस्त चिखलीकरांनी दिला अतिशय चांगला प्रतिसाद💥 

 ✍️ मोहन चौकेकर                                                                

चिखली : प्राचार्य निलेशभाऊ गावंडे सरांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली चिखलीतील विर सावरकर नगर नवरात्र उत्सव मंडळातर्फे चिखलीत  मोठ्या व भव्य दिव्य प्रमाणात  गरब्याचे आयोजन करण्यात आले   असुन  येथे शैकडोच्या संख्येने तरुण,तरुणी, महिला, पुरुष, लहान मुले,मुली अतिशय शिस्तबद्ध  पद्धतीने  गरबा  खेळताना दिसत आहेत. नागपूर येथील  गायक , गायीका या दोघांचाही आवाज अतिशय सुंदर व श्रवणीय आहे. हे गायक व गायीका अतिशय सुंदर व सुरेल आवाजात तरुण तरुणींना आवडेल अशी एका पेक्षा एक सरस , सुंदर व श्रवणीय गाणी म्हणताना दिसत आहे.  त्यामुळे समस्त चिखलीतील तरुण तरुणाई या गाण्यावर गरबा खेळत मैदानावर थिरकतांना दिसत असल्याचे सुंदर व मनमोहक दृश्य येथे पहावयास मिळत आहे. विर सावरकर मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,  युवा नेते तुषार भावसार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्त्यांचे नियोजन अतिशय सुंदर  चांगले व शिस्तबद्ध असल्याचे दिसून येत आहे.चिखलीतील प्रसिद्ध निवेदक म्हणून प्रसिद्ध असलेले गणेशकर सर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करत आहेत. गरबा अतिशय शिस्तबद्ध   पद्धतीने व अतिशय चांगला होत असल्याने संपूर्ण चिखलीच्या विविध भागातील, काॅलनीतील, गल्लीतील तरुण, तरुणी, महिला पुरुष लहान मुले येथे येऊन हा गरबा पाहायचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या