💥कै.सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालयात मराठी आणि रासेयो च्या वतीने विवेकानंद केंद्राची परीक्षा संपन्न....!


💥डिसेंबर महिन्यात कन्याकुमारी येथे होणाऱ्या युवा नेतृत्व विकसन शिबीरात विशेष सहभाग नोंदवता येणार💥

 परभणी : येथील स्वामी विवेकानंद केंद्र शाखा आणि कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वराज्य ७५ स्वामी विवेकानंद आणि युवा या पुस्तकावर आधारित युवा नेतृत्व विकसन उपक्रम 2022 अंतर्गत वस्तूनिष्ठ स्वरूपाची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा पार पडली.या परीक्षे सह  शिबीरात सहभागी विद्यार्थीनींना जीवन कौशल्य, स्थापन कौशल्य विकासनाच्या शैलींचा अभ्यास होणार आहे, स्थानिक पातळीवर एकदिवसीय युवा नेतृत्व विकसन शिबीरात सहभागी होता येईल, डिसेंबर महिन्यात कन्याकुमारी येथे होणाऱ्या युवा नेतृत्व विकसन शिबीरात विशेष सहभाग नोंदवता येणार आहे तसेच सहभागाचे प्रमाणपञ देण्यात येणार आहे.

       सदरील महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर महाविद्यालयातील एकूण ५० विद्यार्थ्यांनीनी सहभाग नोंदवत ही परीक्षा दिली. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद केंद्राचे डॉ.उत्तमराव वानखेडे,ॲड.मयूर सोलापुरकर,तन्वी जोहारे, विशाखा नायक यांचे सह मराठी विभाग प्रमुख प्रा.अरुण पडघन, प्रा.डॉ.आशा गिरी यांचे योगदान लाभले.....





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या