💥निवृत्तीवेतन धारक,विधूर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना हयात प्रमाणपत्र देण्याचे आवाहन....!

                           


                                                      

💥प्रमाणपत्रासोबत स्वतचा फोटो, आधार कार्ड झेरॉक्स व बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडणे अनिवार्य💥

परभणी (दि.18 आक्टोंबर) : पंचायत समिती परभणी अंतर्गत निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत विहीत नमुन्यात पंचायत समिती परभणी येथील लेखा विभागात निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र व विधूर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रासोबत पुनर्विवाह न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष सादर करावे.

 हयात प्रमाणपत्रावर निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकेचे व्यवस्थापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक असून ह्यात प्रमाणपत्रासोबत स्वतचा फोटो, आधार कार्ड झेरॉक्स व बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडणे अनिवार्य आहे असे, आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, परभणी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या