💥पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे शेतीच्या वादातुन सोयाबीन जाळले.....!


💥फिर्यादीने सख्ख्या भावावरच केला सोयाबीन जाळल्याचा आरोप : पुर्णा पोलिस पोलिस स्थानकात गुन्हा दाखल💥

पूर्णा : कापणी करुन शेतात ठेवलेले सोयाबीन जाळण्यात आल्याची घटना पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी शिवारात घडली आहे दोन भावात शेतीच्या वाटणीवरुन न्यायालयात वाद सुरु आहेत याच वादातून सोयाबीन जाळल्याची घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणी एकावर पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मण लोकडोबा खंदारे यांनी तक्रार दिली आहे फिर्यादीचे आहेरवाडी शिवारात शेती आहे.


फिर्यादीचा सख्खा भाऊ नामदेव खंदारे यांच्या सोबत शेतीच्या वाटणीवरुन पूर्णा न्यायालयात वाद सुरु आहे फिर्यादीने शेतात सोयाबीन लावले होते पाच ते सहा दिवसापूर्वी सोयाबीन कापुन एका ठिकाणी ढिग करुन झकुन ठेवण्यात आले होते १९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ०७-०० वाजता गावातील संदिप राऊत यांनी तुमच्या शेतातील सोयाबीनची वळई जळत आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने शेताकडे धाव घेतली. सोयाबीनला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत सोयाबीन जळून खाक झाले होते.

शेतीच्या वादाच्या कारणावरुन नामदेव खंदारे याने सोयाबीन जाळून नुकसान केले. याची विचारणा करण्यासाठी गेल्यावर संबधीताने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली सदर प्रकरणी नामदेव खंदारे याच्यावर पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या