💥पुर्णेतील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महास्वच्छता अभियान संपन्न...!


💥यावेळी परिसरातील जमा केलेला कचरा व प्लास्टिक एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली💥

पूर्णा (प्रतिनिधी - दि.२० आक्टोंबर) - युवा सांस्कृतिक व क्रीडा मंत्रालय दिल्ली यांच्या सूचनेनूसार दिनांक १९आँक्टोबर २०२२ रोजी संपूर्ण भारतभर  महास्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद म्हणून येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आदर्श कॉलनी व महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. 

यावेळी परिसरातील जमा केलेला कचरा व प्लास्टिक एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडीत जमा करण्यात आला.या महास्वच्छता अभियानामध्ये  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.पी.डी.सूर्यवंशी,प्रा.डॉ.दीपमाला पाटोदे,प्रा.डॉ.भिमराव मानकरे,प्रा.डॉ.विजय भोपाळे,‌ प्रा.डॉ.संजय कसाब,प्रा.डॉ.भारत चापके,डॉ.जगन्नाथ टोम्पे,प्रा.डॉ. जितेंद्र देशमुख,प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी,प्रा.डॉ.पी.के. किर्तनकार,प्रा.अतुल शिंदे,प्रा डॉ.मारोती भोसले,प्रा.डॉ.जळबा हटकर आदी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.या अभियानामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या