💥जिंतूर येथे विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाकडून तहसीलदारांना देण्यात आले निवेदन....!


💥तालुक्यातील पिक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचीही मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या विविध मागण्या तसेच जिंतूर शहराचा पाणीपुरवठा  सुरळीत करावा   या संदर्भात तहसीलदार साहेब यांना आज दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत मा. नगर अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. यामध्ये तालुक्यातील कमी पावसाच्या खंड तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याचे झालेले प्रचंड हानी व अत्यल्प भाव यामुळे शेतकरी भरडला जात आहे दुर्दैवाने आत्महत्या चे प्रमाण वाढत आहेत मेहरबान साहेबांनी शेतकऱ्याचे होणारे दुर्दशा पाहून त्वरित खालील मागण्यात सात दिवसात सोडून शेतकऱ्याला दिवाळी सणाचा गोडवा घालण्याचा प्रयत्न करावा अन्यथा एक नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत 1) जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारे 100% विमा संरक्षित रक्कम देण्यात यावी २) 2018 चे 33% पेक्षा अधिक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली होती परंतु त्यात काही मंडळाचे रखडलेले 63 कोटी 31 लाख 67 हजार त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावेत.३) जुने ते ऑगस्ट 2022 मध्ये पाऊस न पडल्याने 35 दिवसाचा खंड पडला होता आणि मागील महिन्याभरात अतिवृष्टी घाशी आलेल्या सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झालेले आहेत अतिवृष्टीने संपूर्ण पिकाचे नुकसान झालेले करिता प्रत्येक मंडळात सरसकट पंचनामे करून प्रति एकर तेरा हजार 600 प्रमाणे 3 हेक्टर पर्यंत जारी केलेली मदत शेतकऱ्याच्या खात्यावर करावी. तसेच जिंतूर शहराचा पाणीपुरवठा मागील दोन आठवड्यापासून जिंतूर शहराचा पाणी पुरवठा नियोजनपूर्वक विस्कळीत झालेला असून शहरातील नागरिकांना एन सणसूतीच्या काळात सर्व कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपला मेन हायड्रो पॉवर स्टेशनवरून लाईट सप्लाय केली जात होती पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही पावर सप्लाय बंद करण्यात आलेली व सध्या 33kv वरून ही पावर सप्लाय वॉटर पंपला चालू असून वारंवार लाईट ट्रीपिंग मुळे पाण्यात पाण्याचा पाणीपुरवठा अडचणी निर्माण होत आहे.या मागणीचे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे बोरी मार्केट कमिटीचे सभापती राजेंद्र नागरे, गंगाधर नागरे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशवराव बुधवंत, मा. युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नागशेन भेरजे ,सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे, संतोष आंधळे , मोहसीन खान पठाण, खाजा खान, हाशम शयद,  रावसाहेब खंदारे ,प्रदीप चव्हाण, जाबीर मुल्ला ,अज्जू कुरेशी, फैजल शेख, लक्ष्मीबाई राठोड, नानासाहेब निकाळजे, बद्रुद्दीन काजी, शांताबाई बंन, पप्पू टाकरस, शिराज भाई , रामप्रसाद माघाडे ,जम्मूभाई, आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या