💥गंगाखेडात अमाप ऊत्साहात प्रचंड जनसमुदायाच्या ऊपस्थितीत अपप्रवृत्तीचे दहन....!


🔹’साईसेवा’ कडून गोदाकाठावर सप्तरंगी आतिषबाजी🔹 


गंगाखेड (दि.०६ आक्टोंबर) : भाविक-भक्त, नागरिकांची प्रचंड ऊपस्थिती, प्रेक्षकांचा अमाप ऊत्साह, निसर्गाने दिलेली साथ या सर्व पार्शभूमीवर साईसेवा प्रतिष्ठाणचा गोदाकाठावरील दसरा महोत्सव संपन्न झाला. विविध पक्षीय नेते, प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची ऊपस्थिती, गुणवंत गौरव, स्थानिक कलाकारांचे सांस्कृतीक सादरीकरण, ड्रोन कॅमेरा चित्रीकरणासह भव्य पडद्यावरील प्रक्षेपण आणि नेत्रदिपक आतिषबाजीसह अपप्रवृत्तींचा ५१ फुटी पुतळा दहन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. 


गंगाखेडच्या सुप्रसिद्ध दसऱ्याच्या पार्शभूमीवर साई सेवा प्रतिष्ठाणने गेल्या २१ वर्षांपासून गोदातटावर अपप्रवृत्ती पुतळा दहन परंपरा जपली आहे. यावर्षी विशेष ऊत्साहात हा सोहळा संपन्न झाला. गंगाखेडचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार गोविंद येरमे, पोलीस निरीक्षक सुनिल माने, मनसे किसान प्रदेश ऊपाध्यक्ष बालाजी मुंडे, युवा नेते ॲड मिथीलेश केंद्रे, मेजर विश्वनाथ सातपुते, आप जिल्हा ऊपाध्यक्ष सखाराम बोबडे, नाभीक सेनेचे बालासाहेब पारवे, गोपी मुंडे, नारायण घनवटे आदिंची या प्रसंगी प्रमुख ऊपस्थिती होती. सेवानिवृत्त प्राचार्य, ईतिहासकार डॉ. अनिल सिंगारे, निट गुणवंत तमसील रईस कादरी, आदर्श शिक्षीका सौ. ईंदुमती कदम-आवंके यांचा या मंचावरून गौरव करण्यात आला. शहरातील प्रिभूषन अकादमीचे भूषण गाडे, स्टार डान्स स्टुडीओ चे राधे आवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी एकाहून एक सरस नृत्य सादर करत ऊपस्थितांची मने जिंकली. 

साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा संयोजक, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तीवीक केले. सहसंयोजक कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, सचिव नागेश पैठणकर, रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर, बालासाहेब यादव, गुंडेराव देशपांडे, नंदकुमार भरड, किरण जोशी, अतुल गंजेवार, गोविॅद रोडे, किरण जोशी,  राजेंद्र पाठक, वर्षा यादव, स्वाती पैठणकर, पुजा यादव आदिंनी ऊपस्थितांचे स्वागत केले. नेत्रदिपक आतिषबाजी नंतर अपप्रवृत्तींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी व्यंकट रमना गोविंदा आणि जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता जोशी यांनी केले. तर आभार शेख युनूस यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल भुसांडे ( हिंगोली ), महेश परडे, सुहास देशमाने, सिद्धार्थ भालेराव, बाळासाहेब सोनटक्के, व्यंकटेश यादव, मारोती गोरे, शिवा डमरे, अशोक राष्ट्रकुट, पप्पू राऊत, किरण यादव, शिवा शिंदे, लाला अनावडे, प्रकाश शिंगाडे, दत्तराव भिसे, नागनाथ चोरघडे, परसराम गिराम, भगत सुरवसे आदिंसह प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री शिवाजी हजारे आणि शेख कन्स्ट्रक्षणचे मेहराज शेख यांचा या भागात राबविलेल्या विशेष स्वच्छता अभियानाबद्दल प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात आला. 


* रस्ते, नेटवर्क जॅम :-

कार्यक्रम स्थळी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. कार्यक्रम सुरू होऊन संपेपर्यंत जनाबाई मंदिर पर्यंत आणि तारू मोहल्ला भाग व मुख्य पायऱ्यापर्यंत वाहतुक तुंबली होती. तसेच मोबाईल नेटवर्कही जाम झाले होते. कार्यक्रम संपता संपता रीमझीम पाऊस सुरू झाल्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतर जवळपास दोन तास रस्त्यांवर तुडुंब गर्दी बघायला मिळाली. यावेळी पोलासांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या