💥उडान सेवाभावी संस्थेच्या आरोग्य शिबीरात तीन हजार नागरीकांनी घेतला लाभ...!


💥या शिबिराचे उद्घाटन परभणी मनपाचे महपौर सय्यद समी उर्फ माजू लालांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले💥

परभणी : शहरातील उडान सेवाभावी संस्थेच्या वतीने ईद-ए-मिलादुंन्नबी निमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील 3 हजार 200 नागरीकांनी लाभ घेत अनेक रोगावर मोफत उपचार व औषधी देण्यात आली. तसेच या शिबिराचे उद्घाटन परभणी शहर महानगर पालिकेचे महपौर सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.

शहरातील संजय गांधी नगर परिसरात राहणारे एस.के गौस है प्रसिद्ध समाजसेवक असून गोर गरीबांच्या गतीला नेहमीच धावून हात देण्याचे महान कार्य करीत आले आहेत. त्यांनी उडान संस्थेच्या माध्यमातून अनेक शिबिराचे आयोजन करून गोर गरीब नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. 

सदरील शिबिर यशस्वी करून परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध समाजसेवक एस. के. गौस यांचे परभणी शहर महानगर पालिकेचे महपौर सय्यद समी उर्फ माजू लाला, काँगेस चे जेष्ठ नेते गफार मास्टर आदींनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या वेळी शेख बादल भैया, रशीद खान, विजय गिरी, शेख इरफान, शेख मोईन, शेख जमीर, शेख नदीम, शेख नवाब, शेख इम्रान, शेख शफीक, ख्वाजा भाई, रशीद खान, गफ्फार खान, शेख अझहर, शेख रेहान आदी सह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरील शिबिरास यशस्वी आरोग्य तपासणीसाठी डॉ. धर्मराज चव्हाण, डॉ. शोएब अन्सारी डॉ. अ.रहीम, डॉ. संजय बनसोडे, डी. करण गोरे वैद्यकीय अधिकारी डॉ. जेथलिया मॅडम, डॉ. सलमा पठाण मॅडम, डॉ. जाधव मॅडम आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या