💥विद्यार्थ्यांनी वर्तमानात सामाजिक उत्तरदायित्वाची भान जपले पाहिजे - प्रा.डॉ.संजय कसाब


💥यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद आप्पा ऐकलारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव अमृतराज कदम हे होते💥

 पूर्णा (दि.१८ आक्टोंबर) - वर्तमान स्थितीत देशातील विद्यार्थ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपले पाहिजे असे प्रतिपादन प्रोफेसर डॉ.संजय कसाब यांनी केले.ते येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या मानवविद्याशाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .यावेळी उद्घाटक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद आप्पा ऐकलारे ,सचिव अमृतराज कदम ,सहसचिव प्रा. गोविंदराव कदम प्राचार्य डॉ. के. राजकुमार तर प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रोफेसर डॉ. संजय कसाब यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना प्रोफेसर डॉ.संजय कसाब म्हणाले की, विद्यार्थ्यांना  ग्रंथाचे वेड लागले पाहिजे, वाचन संस्कृतीने माणसाचा व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांनी शून्यातून विश्व निर्माण करायचे असेल तर जिद्दीच्या जोरावरच कठोर परिश्रम केले पाहिजे आज-काल मोबाईलचा वापर.विद्यार्थ्यांनी योग्य वेळीच करावा अतिवापर करून आपला वेळ वाया घालू नये. आजच बेरोजगारीच्या काळात सामाजिक दायित्वाचे भान ठेवून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात केले. याप्रसंगी प्रा डॉ पांडुरंग भुताळे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी अभ्यास व कष्ट यांची सांगड घालून जीवन यशस्वी करण्याचे आव्हान केले स्पर्धेच्या युगात तोच टिकतो जो काळानुरुप नवीन नवीन कौशल्यांनी काढतो असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितला या कार्यक्रमासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या भितीपत्रिकाची कौतुक केले याप्रसंगी भक्ती लोखंडे आणि दीप्ती लोक रणवीर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक गंगाधर गाय गोधणे यांनी केले सूत्रसंचालन गंगाधर प्रजापती तर आभार आकाश भगत यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचे डॉ संजय दळवी प्रा.डॉ.प्रकाश भांगे प्रा.डॉ. शिवसांब कापसे डॉ विजय पवार डॉअंबिका चोंडे डॉ वैशाली भगवान डॉ सोमनाथ गुंजकर डॉ. ओमकार चिंचोले डॉ.रेखा पाटील डॉ. विनोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या