💥पुर्णा तालुक्याती निळा येथील पुर्णा नदीच्या पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह...!


💥नदीपात्रातील पाण्यात वाहून आल्यामुळे अडकला काटेरी झुडपात💥

पुर्णा (दि.१३ आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील मौ.निळा येथील पुर्णा नदीपात्रात आज गुरूवार दि.१३ आक्टोंबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास एक अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून येवून काटेरी झुडपात अडकला असल्याचे गुराख्याला गुरांना पाणी पाजण्यास घेऊन गेले असतांना निदर्शनास आला.

 या संदर्भात संबंधित गुराख्याने निळा गावचे सरपंचांना भ्रमणध्वनीवरून कळवले असून सदरील अनोळखी ईसमाचा मृतदेह या गावचे पोलिस पाटील बुध्दे यांच्या शेतालगत असलेल्या पुर्णा नदीपात्रात अडकल्याचे निदर्शनास आले असून मयत इसमाच्या अंगावर पिवळा शर्ट व निळ्या रंगाची पँट असल्याचे निदर्शनास येत असून या संदर्भात पुर्णा पोलिस स्थानकाला कळवले असल्याचे सरपंच यांच्याकडून समजते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या