💥पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापण समिती बिनविरोध..!


💥शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष पदावर सुरेश प्रभाकरराव भोसले तर उपाध्यपदी आत्माराम वाघमारे यांची निवड💥


पुर्णा (दि.१० आक्टोंबर) -
तालुक्यातील मौ. सुहागन नगरीत आज सोमवार दि.१० आक्टोंबर २०२२ रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती निवडणूक संदर्भात सुहागण ग्रामपंचायतीचे सरपंच/उपसरपंच यांच्यासह चेअरमन सुभाषराव भोसले,ग्राम पंचायत सदस्य माऊली भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अरुण वाघमारे,राजकुमार भोसले,नारायण भोसले,खुशाल भोसले,गंगाराम भोसले व सर्व पालक मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी सुरेश प्रभाकरराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी आत्माराम वाघमारे,शालेय शिक्षणतज्ञ हरी नागोराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक साईनाथ रामोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी सर्व पालकांचे व शिक्षकवृन्द तसेच हजर असलेल्या गावकरी मंडळीचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या