💥नांदेडातील मुगट मधील ऐतहासिक धार्मिक स्थान गुरुद्वारा माता साहिब देवाजी येथे माता साहिब देवाजी जन्मोत्सवाचे उद्घाटन..!


💥तीन दिवसीय भक्तीचा जागर सुरु💥 


नांदेड (दि.07 ऑक्टोबर) : येथील मुगट परिसरातील ऐतहासिक धार्मिक स्थान गुरुद्वारा माता साहिब देवाजी येथे दर वर्षाप्रमाणे यावर्षीही शुक्रवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 341 व्या माता साहिब देवाजी जन्मोत्सवाचे उद्घाटन पार पडले. शिरोमणि पंथ अकाली बूढा दल 96 करोडी व गुरुद्वारा माता साहेबदेवाजी यांच्या संयुक्तमाध्यमाने आयोजित या जन्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन तखत सचखंड श्री हजुरसाहिब येथील मीत ग्रंथी सिंघसाहिब भाई गुरमीतसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुखी संत बाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा माता साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी आणि इतर संत मंडळी उपस्थित होती. 

जन्मोत्सव निमित्त श्री गुरु ग्रन्थसाहेबांच्या विशेष पाठची सुरुवात करण्यात आली. गुरुग्रंथ साहेबाचे हुकुमनामा घेत कीर्तन दरबार कार्यक्रमास सुरुवात झाली. गुरुबाणी कीर्तन आणि कथा कार्यक्रम पार पडले. आज प्रारंभी रागी भाई हरजीतसिंघजी, भाई मनिंदरसिंघजी हजूरी रागी जत्था माता साहिब, भाई जरनैलसिंघ हजूरी रागी तखत सचखंड, ज्ञानी सुखविंदरसिंघ हनुमानगढ राजस्थान, कवीश्वर भाई सुखबीरसिंघ गुर नानक दल मड़ियावाले यांनी कार्यक्रम प्रस्तुत केले सूत्रसंचालन ज्ञानी प्रभजीतसिंघ निर्मले पटियाला यांनी केले. 

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील सुप्रसिद्ध रागी जत्थे येथे दाखल झाले आहेत. ज्ञानी हरिंदरसिंघ अलवरवाले कथाकार हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहेत कार्यक्रमात विविध निहंगसिंघ दलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमात ज्ञानी गुरपिंदरसिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य राजिंदरसिंघ पुजारी, गुरमीतसिंघ बेदी, गुलाबसिंघ असर्जनवाले, राजसिंघ रामगडिया यांनी व्यवस्थापन कार्यात मदत केली. कार्यक्रमात मोठ्या संख्येत भाविक उपस्थित होते. उद्या दि. 8 रोजी दुपारी नेजाबाजीचे कवयती ठेवण्यात आले असल्याची माहिती संत बाबा तेजासिंघजी यांनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या