💥अ.भा.साहित्य परिषदेतर्फे कोजागिरीनिमित्त डॉ.प्रज्ञा आपटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन.....!


💥वैदर्भीय वाड्मयविश्वातील शारदा सरस्वती या विषयावर होणार व्याख्यान💥 

✍️मोहन चौकेकर 

नागपूर : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांतातर्फे कोजागिरीनिमित्ताने विख्यात साहित्यिक आणि समिक्षा डॉ प्रज्ञा आपटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सोमवार दि. १० अॉक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ हेडगेवार रक्तपेढीचे सभागृह, धरमपेठ नागपूर येथे करण्यात आले आहे.

वैदर्भीय वाङमयविश्वातील शारदा सरस्वती या विषयावर होणा-या या व्याख्यानाचे अध्यक्षस्थानी सेवासदन संस्थेच्या सतीश प्रा. वासंती भागवत या राहणार आहेत.या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष ॲड.लखनसिंह कटरे, कार्याध्यक्ष अविनाश पाठक, महामंत्री ॲड.सचिन नारळे यांनी केले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या