💥पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील सुशिक्षित......!


💥बेरोजगार युवक-युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी💥

परभणी (दि.17 आक्टोंबर) : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींसाठी खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 ऑक्टोबर, 2022 रोजी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजीत करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या रोजगार विभागाकडून जिल्ह्यातील बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास विविध नामांकित उद्योजक सहभाग नोंदविणार आहेत. जिल्ह्यातील बेराजगार युवक-युवतींना सदर मेळाव्याद्वारे नोकरी प्राप्त करुन घेऊन त्यांचे अर्थिक जिवनमान उंचाविण्याची एक मोठी सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे.


रोजगार मेळाव्याद्वारे नोकरी प्राप्त करुन घेण्यासाठी सदर रोजगार मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या mahaswayam.gov.in या वेबसाईटवर करावी. नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. सर्वप्रथम www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Job Seeker (म्हणजेच नोकरी शोधणारा) या पर्यायावर क्लिक करणे. यानंतर वेबासाईट आपली बेरोजगार म्हणून नोंदणी असेल तर लॉग ईन बॉक्स मध्ये युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन लॉग ईन करावे. जर पूर्वी नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी या पर्यायावर क्लिक करुन आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरल्यास मो. क्र. व ईमेल आयडीवर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल.  युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन login या पर्यायावर क्लिक करणे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायावर क्लिक करणे. परभणी जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे. आपल्याला Parbhani District Pandit Din Dayal Job Fair Offline 2 मेळावा दिसू लागेल. त्यातील Action या पर्यायावरील View Details या बटणवर क्लिक केल्यावर मेळाव्यास उपलब्ध रिक्त पदे दिसतील list of Vacancy या बटणावर क्लिक करुन शैक्षणिक पात्रतेनुसार Apply करावे. आपल्याला एक संदेश दिसेल. सदर संदेश काळजी पूर्वक वाचा व Ok बटणावर क्लिक करावे, रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल. ऑनलाईन Apply केल्या बाबतच्या व शैक्षणीक कागद पत्रांच्या छायांकित प्रती सहीत दि. 21 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी  9:00 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी येथे नोकरीची संधी प्राप्त करुन घेण्यासाठी हजर राहावे.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या भव्य रोजगार मेळाव्यात सहभागी होवून नोंदवावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02452220074 वर संपर्क साधावा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या