💥विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चक्क दुचाकीवर जाऊन केली अतिवृष्टी भागाची पाहणी....!


💥अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला व पाहणी💥


✍️ मोहन चौकेकर 

धुळे : महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते यांचा आज (१५ ऑक्टोबर)धुळे जिल्ह्यात वादळग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या गावांचा पाहणी दौरा होता. वणी वडणे निकुंबे ता.धुळे या ठिकाणी चारचाकीने जाण्या सारखी वाट नव्हती, अतिवृष्टीच्या पावसामुळे वाट बिकट झाली असावी बहुदा, अशा परिस्थितीत न डगमगता,मनात कमीपणा न आणता निसंकोच ना.अंबादास दानवे यांनी चक्क दुचाकीने स्वतः चालवत जाऊन  या वादळग्रस्त गावांस आज भेट दिली. यावेळी सरपंच संग्राम गिरासे यांच्यासह भागातील कापूस आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला व पाहणी केली.


भानुदास मना पाटील यांच्या शेताचे अतिवृष्टी व विज पडून ७५ टक्के नुकसान झाले. तेथेही भेट देऊन पाहणी करुन शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला. यावेळी माजी आमदार शरद पाटील, जिल्हाप्रमुख हेमंत सोळुंके, हिलाल माळी, मंगेश पवार, गिरीष देसले आदी उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या