💥चिखली येथील छ्त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऐन दिवाळी सनाच्या तोंडावर अंधारात.....!


💥छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील हायमास्ट व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आतील लाइट बंद💥 

✍️ मोहन चौकेकर                                                                   

बुलढाणा/चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपरिषद प्रशासनाच्या व एमएसीबी / Macb प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर अंधारात असल्याचे दिसून येते आहे. दिव्यांच्या उजेडाचा मोठा सन असलेला दिवाळी सारखा मोठा उत्सव अवघ्या चार पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने चिखली शहरातील काही दुकानदारानांवर व काही ठिकाणी घरावर लाईटिंगचा झगमगाट असल्याचे चिखली शहरात दिसुन येत आहे मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपरिषद प्रशासनाच्या व एमएसीबी Macb प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर अंधारात  असल्याचे विदारक चित्र दिसुन येते आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील हायमास्ट व पुतळ्याचा आतील लाइट बंद आहे. गेल्या दिड दोन महिन्यात   दोन तिनवेळा हा प्रकार घडला आहे. मागे मी स्वतः एमएसीबी अधिकाऱ्यांशी व संबंधित नगरपरिषद कर्मचाऱ्यांशी   फोनवर बोलुन हे लाईट सुरू /  लाऊन  घेतले होते व मागील महिन्यात २० सप्टेंबर रोजी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंधारात असल्याची बातमी मी टाकली असता ताबडतोब या बातमीची दखल आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या कार्यालयाने व युवा नेते शिवराजभाऊ पाटील यांनी घेतली होती व त्यांनी ताबडतोब नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी  प्रशासकांना व एमएसीबी अधिकाऱ्यांशी  याबाबत बोलुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील हायमास्ट व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आतील बंद असलेले लाईट सुरू करुन घेतले होते  . महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वारंवार अंधारात राहतो  हे दिसायला पण चांगले दिसत नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौक हा कायम चार चाकी व टुव्हिलर गाड्यांच्या वाहतुकीच्या वर्दळीने भरलेला असतो. तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांची / मानसांची देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौकात कायमच वर्दळ असते तरी नगरपरिषद प्रशासनाने व macb  प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे नाहीतर या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एखादा अपघात देखील होण्याची शक्यता आहे व आता तर दिवाळी अवघ्या चार पाच दिवसांवर असल्याने बाजारात खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची चारचाकी व दुचाकी गाड्यांची व पायी जाणाऱ्या नागरिकांची खुप मोठी वर्दळ दिसुन येते आहे त्यामुळे  तरी नगरपरिषद प्रशासनाने व एमएसीबी/ Macb प्रशासनाने ताबडतोब या गोष्टी ची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आतमधील लाईट व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील हायमास्ट  लवकरात लवकर म्हणजे ताबडतोब सुरू  करावा.     ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या