💥पुर्णेत उद्या रविवारी कपीलधार कडे जाणाऱ्या पदयात्रेचे स्वागत.....!




💥स्वागतासाठी सज्ज होण्याचे लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आवहान💥

पूर्णा (दि.२७ आक्टोंबर) - ४१ वर्षांची परंपरा असलेल्या वसमत-कपीलधार यात्रेचे यंदाही पूर्णेत मोठं जंगी स्वागत करण्यात येणार आहे उद्या रविवार दि.३० ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा शहरात पूर्णा शहरातुन मार्गस्थ होणार असल्याने यात्रेच्या स्वागतासाठी नांदेड रोड वरील बाबा पेट्रोल पंप येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन येथिल लिंगायत समाज बांधवांनी केले आहे.


     सिध्देश्वर मंदिर लासीन मठ संस्थान वसमत जि.हिंगोली येथील लिंगैक्य १०८ शिवाचार्य महाराज यांनी १९८२ साली सुरू केलेल्या वसमत ते कपिलधार यात्रेची सुरुवात केली होती.ही परंपरा आजही विद्यमान मठाधीश श.ब्र.प.१०८ करबसव शिवाचार्य महाराज यांनी अखंडपणे चालू ठेवली आहे.यंदाही कपीलधार येथील संत मन्मथ स्वामी महाराज यांच्या यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी वसमत येथुन शनिवारी २९ आॅक्टोंबर रोजी या पदयात्रेस सुरुवात होणार आहे.मजल दरमजल करत ९ दिवसांत ही पदयात्रा कपीलधार  पोहणारे आहे.रविवार दि.३० आक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता ही पदयात्रा पूर्णा शहरातील नांदेड रस्त्यावरील एकलारे अप्पा यांच्या पेट्रोल पंपावर येणार असून तेथुन ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत पदयात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.ही पदयात्रा पूर्णा शहरातील बसस्थानक, आनंद नगर चौक, महात्मा बसवेश्वर चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक महादेव मंदिर ते गुरुबुद्धीस्वामी मठसंस्थान येथुन जाणार आहे.येथिल गुरुबुद्धीस्वामी मठात यात्रेस अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या पदयात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रमोद (राजु) एकलारे ,संभाप्पा धुळे, चंद्रकांत भालेराव, प्रकाश महाजन, गंगाधर महाजन,बंडुअप्पा कापसे,संजय पाथरकर,सुरेश लोखंडे, रमेश एकलारे,बाबा सोनटक्के,अजय एकलारे, नागनाथ भालेराव,नंदकुमार भालेराव,केदार पाथरकर, राहुल बरदाळे, शिवाजी भालेराव,ॲड.अमोल पळसकर,आदीं लिंगायत समाज बांधवांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या