💥परभणी जिल्हा गोरसेना ऊसतोड (श्र) कामगार संघटनेच्या संपर्क प्रमुख पदी बंजारा समाजनेते वैजनाथ जाधव यांची निवड..!


💥यानिवडींचे ऊसतोड कामगारांमधुन जोरदार स्वागत करण्यात येत आहे💥

सोनपेठ (प्रतिनीधी) :- ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार्या गोरसेना ऊसतोड (श्रमिक)कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी संघटनेच्या परभणी जिल्हा संपर्कपदी नैकोटा ता.सोनपेठ येथील वैजनाथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. यानिवडींचे ऊसतोड कामगारांमधुन स्वागत करण्यात येत आहे.

     ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना ऊसतोड दरवाढ,कामगारांच्या नावाने जिवन विमा,आरोग्य विमा,अपघातात मृत्यु पावलेल्या ऊसतोड कामगारास त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, मुकादम, वाहतूकदार यांचे दर वाढवुन द्यावे,गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी ऊसतोड कामगारांच्या अशा अनेक मागण्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका मांडणारी संघटना म्हणुन गोरसेना ऊसतोड (श्रमिक) कामगार संघटना ओळखली जाते.या संघटनेचे कार्य प्रत्येक ऊसतोड कामगारापर्यंत पोंहचवावे, कामगारांमध्ये आपल्या हक्काबाबत जागृती व्हावी यासाठी संघटनेच्या नविन निवडी करण्यात येत असुन यामध्ये परभणी जिल्हा संपर्कपदी नैकोटा ता.सोनपेठ येथील वैजनाथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते माणिक भाऊ फड  व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. When you play free on-line slots in practice mode, the on line casino funds your account with some further playable points or funds. But for every round you win, you don’t get actual money bonuses. However, should you resolve to play for actual money after working towards, find a way to|you presumably can} win actual money too. The greatest on-line casinos supply free spins as bonuses 온라인카지노 after your preliminary deposits with certain video games or through loyalty programmes.

    उत्तर द्याहटवा