💥अकोल्या जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ताकदीने लढण्याचा निर्धार करण्याचा संकल्प करा - अंबादास दानवे

 


💥दानवेंनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत शिवसेना पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना दिला इशारा💥

✍️ मोहन चौकेकर 

अकोला - जे ४० आमदार शिवसेनेतून गेले त्याऐवजी ८० आमदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ताकदीने लढण्याचा निर्धार करण्याचा संकल्प करा असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत शिवसेना पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना दिला.

शिवसेनेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सक्षम नेतृत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील सर्व निवडणूकात भगवा झेंडा फडकाविण्याचा निर्धार करा. शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण हालविण्याचे काम गद्दारांनी केले, त्यांना धडा शिकवायचा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून निमित्त शोधून शिवसैनिकांनी जनतेत मिसळून काम करा जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना पोहचेल.राज्य सरकारने सामान्य माणसांना जाहीर केलेली दिवाळी भेट तपासून त्यातून काळभोर शोधणे हे शिवसेनेचे काम आहे. उद्धव साहेबांच्या संघर्षात जो साथी आहे तोच खरा शिवसैनिक.

 सरकारच्या १०० दिवसांत कुठलेच धोरणात्मक निर्णय नाही, उलट महिलांवरील अत्याचार,शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना मदत न करता सूड बुद्धीने सरकार काम करत असल्याची टीका दानवे यांनी केली सर्वसामान्य माणसांना शिवसेनेत काम करण्याची संधी आहे, तुम्ही जिंकू शकता असा निश्चय मनात करा म्हणजे तुमचा विजय निश्चित होईल असा विश्वास दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  यावेळी आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख,अकोला ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकर,अतुल पवनीकर,शहरप्रमुख राजेश मिश्रा,महिला आघाडीच्या जोत्स्नाताई चौरे,माया म्हैसने,देवश्री ठाकरे,नितीन पाटील, उपजिल्हा संघटिका शुभांगी किनगे यांच्यासह शिवसेनेचे महिला,पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या