💥परभणी जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यतत्पर मनमिळावू व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड...!


💥पोलिस कर्मचारी पुर्व सैनिक बालकिशन मोहन बरकुंटे (आण्णा) यांचा पायऱ्यावरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू💥

परभणी (दि.०४ आक्टोंबर) : परभणी जिल्हा पोलिस दलात कार्यरत पुर्व सैनिक तथा पोलिस मुख्यालयात चालक म्हणून कार्यरत असणारे अत्यंत कर्तव्यतत्पर व मनमिळावू व्यक्तीमत्व बालकिशन मोहन बरकुंटे (आण्णा) यांचा दुसर्‍या मजल्यावरुन पायऱ्यावरून पाय घसरून  पडल्यामुळे आज मंगळवार दि.०४ आक्टोंबर २०२२ रोजी खाजगी रुग्नालयात उपचार सुरू असतांना पहाटेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.

                 पूर्णा शहरातील शास्त्री नगरातील रहिवाशी ५१ वर्षीय बालकिशन बरकुंटे परभणीच्या पोलिस मुख्यालयात चालक म्हणून कार्यरत होते. नवरात्र महोत्सवानिमित्त बंदोबस्ताचे काम आटोपून ते सोमवार दि.०३ आक्टोंबर २०२२ रोजी सकाळी आपल्या गावी म्हणजे पूर्णेत आले. दुपारच्या सुमारास ते मित्राच्या घराचे बांधकाम पाहण्याकरीता रमाई नगरात गेले होते. त्याचवेळी बांधकाम पाहत असतांना दुसर्‍या मजल्यावरुन पाय घसरून ते खाली कोसळले. त्यात त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज मंगळवारी पहाटे उपचार सुरु असतांना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन भाऊ, बहिण, दोन मुली असा परिवार आहे.

                 बरकुंटे हे सैन्य दलात १६ वर्ष कार्यरत होते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाले. ते एक मनमिळावू व कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या