💥पुर्णा तालुक्यात कामगार/रोजमजूरांचे आर्थिक मानसिक सोशन....!


💥प्रशासनासह कामगार अधिकाऱ्यांचे काराखानदारांशी हितसंबंध ? कामगारांवर सातत्याने होतोय अन्याय💥

परभणी/पुर्णा (दि.२१ आक्टोंबर) - परभणी जिल्ह्यात रोजमजूर/कामगारांच्या हक्कावर सातत्याने गधा आणण्याचे काम कारखानदारांकडून होत असतांना प्रशासनासह कामगार कल्याण अधिकारी जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेत आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रखर लढा उभारणाऱ्या कामगार संघटना देखील हळुवारपणे लोप पावत असल्यामुळे जिल्ह्यात कामगारांना आता कोणीही वाली उरला नसल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील कानखेड शिवारात बळीराजा साखर कारखाना लि.कानखेड व रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तल खाण्यात मोठ्या प्रमाणात कामगार असून या कामगारांचे संबंधित कारखाना प्रशासनाकडून सातत्याने सोशन होत असतांना व या संदर्भात वेळोवेळी जिल्हा प्रशासनासह जिल्हा कामगार अधिकिरी यांच्याकडे तक्रारी दिल्या जात असतांना देखील संबंधित कारखाना चालकांच्या विरोधात कठोर कारवाई होत नसल्यामुळे ? संबंधित मुजोर कारखाना प्रशासन जाणीवपूर्वक  कामगारांवर सातत्याने अन्याय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.


शासकीय नियमाप्रमाणे कुठलाही कारखाना मग तो शासकीय असो निमशासकीय असो की खाजगी त्या कारखान्यात ८०% कामगार स्थानिकच असावे लागतात परंतु स्थानिक कामगार कारखाना प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात संघटीत होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे संबंधित कारखाना चालकांनी आपआपल्या कारखान्यात स्थानिक कारमगारांना प्राधान्य न देता बाहेरील कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरना केल्यामुळे कारखाना प्रशासनाच्या अन्याया विरोधात कोणीही आवाज उठवण्यास तयार नसल्याचे निदर्शनास येत असून संबंधित शिवारात बळीराजा साखर कारखाना लि.कानखेड व रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनी या दोन्ही कारखान्याचे प्रशासन कुठल्याही कामगारांचे पि.एफ/विमा जमा करीत नाहीत या शिवाय त्या कामगारांना कायमस्वरुपी करण्याची वेळ येऊ नये याकरिता अकरा महिन्याच्या आतच कामावरून काढल्या जाते व पुन्हा काही महिन्याचा गॅप देऊन पुन्हा कामावर रुजू करण्यात येतो याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे संबंधित कारखाना प्रशासनाकडून प्रदुशन मंडलाची मान्यता न घेताच कारखाना सुरु केल्या जात असल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांसह आसपासच्या गाव खेड्यांतील नागरिकांना या कारखान्यातून निर्माण होणाऱ्या प्रदुशनामुळे विविध फुफ्फुसांचे आजार जडत असून याचा परिणाम शेतातील उत्पन्नावर देखील होतांना पहावयास मिळत आहे.

बळीराजा साखर कारखाना प्रशासनाकडून कामगारांसह शेतकऱ्यांचे देखील सोशन होत असून दररोज साखरेचा उतारा व ऊस गाळपाची माहीती चुकीची देउन शेतकऱ्यांना एफआरपी कमी दिला जातो शेतकऱ्यांना कारखान्यातील इतर प्रोडक्टचा देखील भाग दिला जात नाही परंतु या गांभीर बाबींकडे प्रशासन देखील लक्ष करीत नसल्यामुळे कारखाना प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ! हितसंबंध यातून निदर्शनास येतात तर याच परिसरात चालणाऱ्या रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तल खाण्यात स्थानिक कामगारांना डावलून मोठ्या प्रमाणात ईतर राज्यातील कामगारांचा भरणा केवळ याकरिताच केला जातो की त्यांच्याकडून रात्रंदिवस काम करून घेता येते याशिवाय त्यांचा पि.एफ देखील कापला जात नाही किंवा त्यांचा कुठलाही विमा केला जात नाही त्यामुळे संबंधित दोन्ही कारखाना प्रशासन कामगारांच्या हक्काचा अक्षरशः बळी देत असल्याचे दिसत असून या कारखान्यांत कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर असल्याचे निदर्शनास येत आहे.....  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या