💥भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना शालेय व्यवस्थापन समिती कडून अभिवादन....!


💥अध्यक्ष विष्णु भोसले उपाध्यक्ष धम्मपाल हानवते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥


ताडकळस : प्रतिनिधी 

पुर्णा : तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेलेल्या मौ.सिरकळस येथे दि.१५ ऑक्टोबर, २०२२  वार शनिवार रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णु श्रीहरी भोसले उपाध्यक्ष धम्मपाल यादवराव हानवते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दत्तराव भोसले,सतिश खंदारे, विष्णु राऊत, बालाजी मंगेवाड, कुंडलिक भोसले,गजानन भोसले,उपसरपंच माधव मंगेवाड, विलास खंदारे,गोरखनाथ हानवते यांच्यासह शाळाचे मुख्याध्यापक महेश पवार, बम्रानंद ढगे सर अदीनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमा नंतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध विषयांवरील पुस्तकाचे एक तास वाचन करण्यास आले.

या कार्यक्रमाचे सुञसंचालन महेश पवार यांनी केले तर आभारप्र दर्शन बम्रानंद ढगे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या