💥दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य करणे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन....!


💥योजना गावपातळीवरुन राबविण्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत अर्ज स्विकारण्यात येणार💥

परभणी (दि.01 आक्टोंबर) :  समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी मार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 5 टक्के सेस निधी मधुन दिव्यांग व्यक्तींना व्यावसायीक पिठाची गिरणी खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य पुरवठा करणे हि योजना सुरु करण्यात आलेली आहे. हि योजना गावपातळीवरुन राबविण्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत अर्ज स्विकारण्यात येणार आहे. या योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत.

अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असने बंधनकारक आहे. त्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 50 पेक्षा जास्त असू नये. अर्जदाराचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त असावे. अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज संबंधीत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे कडे परिपूर्ण भरुन सादर करावा. अर्जदाराचे सर्व मार्गाने सन 2021-22 या वर्षाचे एकुण वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखच्या आत असावे. अर्जदाराने / कुटुंबातील व्यक्तीने मागील तीन वर्षात सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे आधार कार्ड, परभणी जिल्हा ग्रामिण भागातील रहिवाशी प्रमाणपत्र, आधार संलग्न बँक खाते असलेले बँक पासबुक, तसेच सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र व ऑनलाईन केलेले दिव्यांग प्रमाणपत्र यांच्या छायांकीत प्रति अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.

ज्या लाभार्थ्यांनी सन 2021-22 या वर्षात या योजनेचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यांनी आपला प्रस्ताव गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात असल्याची खात्री करुन त्या अर्जासोबत सन 2021-22 या वर्षाचे वरील नमुद केल्याप्रमाणे उत्पन्नाचे प्रमाण पत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच या करिता मागील वर्षाचा प्रस्ताव विचारत घेतल्या जाणार नाही. या योजनेसाठी विहित नमुन्यात अर्ज संबंधीत गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे विहित कालावधीत  सादर करावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या