💥तरुणांनी जिद्दीने यशस्वी उद्योजक बनावे : उद्योजक नरेंद्र चव्हाण💥पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात 'उद्योग क्षेत्रातील संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले💥


पूर्णा. (दि.17 आक्टोंबर) "नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी छोटा मोठा व्यवसाय उभा करणे आवश्यक असते. प्रत्येकाला नोकरी भेटलच याची शाश्वती खुप कमी आहे. अलीकडच्या काळात सुशिक्षित बेकारांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे." असे श्री नरेंद्र दादा चव्हाण म्हणाले. येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात "उद्योग क्षेत्रातील संधी " या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. 


या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री राजुअण्णा एकलारे, सचिव मा. श्री अमृतराज कदम, कोष्याध्यक्ष उत्तमराव कदम , सहसचिव मा. श्री गोविंदराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार उपप्राचार्य डॉ. संजय दळवी तसेच रामेश्वर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मा.श्री नरेंद्र चव्हाण यांनी त्यांचा स्वतःचा उदयोग क्षेत्रातील प्रवास विदयार्थ्यांना सांगितला सध्या देशामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

याशिवाय प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता असते. यासाठी विद्यार्थ्यांनी सद्या गरज लक्षात घेवून कार्य करावे अथवा त्याची सध्याची गरज लक्षात घेऊन वाटचाल करणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाच्या उपयोग स्वतःसाठी व जगासाठी करून उद्योग क्षेत्रात क्रांती करण्याचे आवाहन नरेंद्र चव्हाण यांनी केले.महाविद्यालयीन युवक-युवतींनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर इतरांकडे नोकरी मागण्यापेक्षा उद्योजक बनुन इतरांना नोकऱ्या देणारे बनावे.समाजात आढळणाऱ्या बाबींकडे टीकात्मक नजरेतून न बघता त्यातून चांगला बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत सर्वप्रथम आपली मानसिकता बदलून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी, तरुणांनी ध्येय, चिकाटी ठेवून नवउद्योगनिर्मिती करावी. तसेच खडतर परिश्रमाने आणि जिद्दीने उद्योगधंद्यात यशस्वी व्हावे, असे ते म्हणाले. उद्योग निर्मितीसाठी वय अथवा अन्य कोणत्याही गोष्टीचे बंधन नसून जिद्द, खडतर मेहनत महत्वाची असल्याचे दाखले त्यांनी दिले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला नरेंद्र चव्हाण यांची स्वारातीम विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने तसेच स्टाफ च्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंगाधर कापुरे यांनी केले तर आभार डॉ. पुष्पा गंगासागर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गजानन कुरुंदकर,डॉ. विजय पवार,डॉ. सोमनाथ गुंजकर, डॉ दिशा मोरे, डॉ वृषाली आंबटकर डॉ. अंबिका चौडे, डॉ. रेखा पाटील,श्री त्र्यबंक बोबडे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी, विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या