💥जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना...!


💥या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे (माजीअध्यक्ष) सूर्यकांत घुगे यांची प्रमुख उपस्थिती💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिकशाळा येथे दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी  शाळा इटोली येथे रमणीय आनंददायी वातावरणात शाळेच्या सुसज्ज इमारतीत एक मताने नवीन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली.

      याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे (माजीअध्यक्ष) सूर्यकांत घुगे, अशोक मेनकुदळे (माजी उपाध्यक्ष), संतोष कोद्रे(माजी शिक्षण तज्ञ), आदींचा शाळा व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.तसेच नवीन शाळा व्यवस्थापन समितीचे (अध्यक्ष) नवनाथ मेनकुदळे, (उपाध्यक्ष)आसाराम घुगे, व सन्मानित सदस्य जुम्माखाॅ पठाण(सदस्य), शोभाताई उन्हाळे(सदस्या),दिक्षा घुगे (सदस्या),ज्ञानेश्वर  निंबाळकर (सदस्य), कांताबाई राऊत(सदस्या), सूर्यकांत घुगे(शिक्षणप्रेमी), सुनिता घुगे (ग्रामपंचायत सदस्या), कौशल्या नागरगोजे (ज्येष्ठ शिक्षिका) व शाळेचे मुख्याध्यापक भास्कर जुमडे (सचिव)आदी सदस्यांची शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

     यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर जुमडे, सहशिक्षक भास्कर चव्हाण, परमेश्वर मेनकुदळे, कौशल्या नागरगोजे, मीरा दाडगे, आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या