💥राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद युवा संवाद यात्रेचे उद्या शुक्रवार दि.१४ आक्टोंबर रोजी पुर्णेत आगमन...!


💥शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख साधणार युवकांशी संवाद💥

पुर्णा (दि.१३ आक्टोंबर) - राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आयोजित शरद युवा संवाद यात्रेचे उद्या शुक्रवार दि.१४ आक्टोंबर २०२२ रोजी पुर्णेत आगमन होणार असून या यात्रेच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश काळे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी करण्यात येत असून सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास शहरातील जुना मोंढा परिसरातील गोंधळसम्राट कै.राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहात शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हजारो तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.


शरद युवा संवाद यात्रे निमित्त प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेश विटेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे उद्या शुक्रवारी सकाळी ११-०० वाजेच्या येणाऱ्या या शरद युवा संवाद यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस/राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी/लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई,शहराध्यक्ष प्रताप कदम,मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगर सेवक मो.हाजी कुरेशी,नगरसेवक अमजद साहब नुरी,धाडसी युवा नेतृत्व राज नारायनकर,बालाजी विक्रम कदम,दयानंद कदम,मा.नगराध्यक्ष जाकीर कुरेशी,मा.शहराध्यक्ष अखील अहेमद मा.शहराध्यक्ष शेख खुद्दूस बशीर साहब,संतोष सातपुते,बाबा पठाण इरशाद उर्फ इश्यू पठाण यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या