💥परभणी जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा यल्गार....!


💥रिपब्लिकन सेना जिल्हा प्रमुख राजकुमार सुर्यवंशी यांनी कामगारांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा💥


परभणी (दि.21 आक्टोंबर) - परभणी जिल्ह्यात सर्वत्र बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रचंड प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदी झाल्या असून या बोगस बांधकाम कामगार नोंदनी प्रकरणात जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांचे देखील मुक समर्थन असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे खऱ्या बांधकागारांवर अन्याय होत असल्यामुळे परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेने कामगारांच्या न्याय हक्कासाठी यल्गार पुकारला असून सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून खऱ्या कामगारांचे अनेक प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा कामगार अधिकारी यांना देखुल निवेदन देण्यात आले असून या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की जिल्ह्यात कामगारांना मध्यान भोजन निष्क्रिय दर्जाचं मिळत आहे,जिल्ह्यात खऱ्या कामगारांची नोंद घेतल्या जात नाही बोगस बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी,खऱ्या कामगारांचे रिनिवल होत नाही,कामगारांचे मेडिकल चेकअप होत नाही व आरोग्य शिबिर कुठेच घेतल्या जात नाही,कामगारांसाठी शासनाकडून मदत म्हणून मिळणारा अपघात निधी खऱ्या कामगाराला तात्काळ मिळत नाही,कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती लवकर मिळत नाही,असे असंख्य खऱ्या कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि कामगार ऑफिसचे जे एजंट पैसे देऊन काम करतात जे कागदोपत्री कामगार असतात त्यांची नोंद व शासकीय मदत तात्काळ दिल्या जात आहे 



जिल्ह्यात खऱ्या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार सुर्यवंशी सह सहकारी मैदानात उतरले आहेत येत्या काही दिवसाच्या आत जर का कामगारांचे प्रश्न सुटले नाही तर कामगार अधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे निवासी जिल्हाधिकारी महेश वाडकर साहेब व सरकारी कामगार अधिकारी यांना दिलेला असून या निवेदनावर राजकुमार सुर्यवंशी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष परभणी पूर्व राहुल पुंडगे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष सारनाथ जोंधळे रिपब्लिकन सेना युवा तालुका अध्यक्ष चंद्रमणी लोखंडे रिपब्लिकन सेना शहराध्यक्ष आनंद कणकटे रिपब्लिकन सेना युवा शहराध्यक्ष मनोज मुळे आनंदी इंगळे सिद्धार्थ वाघमारे विकास गायकवाड यदिंच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या