💥पुर्णेतील प्रधानमंत्री आवास योजनेतील असंख्य घरकुल लाभधारक अद्यापही अनुदानापासून वंचित...!


💥प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभधारकांनी थकीत अनुदानासाठी दिला आमरण उपोषणाचा इशारा💥

पुर्णा (दि.०८ आक्टोंबर) - प्रधानमंत्री आवास योजनेतील घोळ संपता संपत नसून या योजनेतील असंख्य लाभार्थ्यांना त्यांच्या अनुदानाचे वेळेवर हप्ते मिळत नसल्यामुळे अनेक लाभार्थी आपल्या अर्धवट झालेल्या बांधकामातील घरांमध्ये तर असंख्य लाभार्थी किरायाने घर घेऊन राहत असल्याचे निदर्शनास येत असून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्यशासनासह केंद्र शासनाकडून मिळालेला कोट्यावधी रुपयांच्या निधीतून लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांच्या उर्वरीत अनुदानाचे हप्ते का जमा केले जात नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असून शेवटी याचे गौडबंगाल काय ? याची देखील चौकशी व्हायला हवी.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरात मागील सन २०१७ यावर्षी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत देखील नियमित स्वरूपात अनुदानाचे हप्ते मिळत नसल्यामुळे त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या घरांची बांधकाम अर्धवट अवस्थेत झालेली असून अनेक लाभार्थी आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचे थकीत अनुदान तात्काळ लाभधारकांना देणे संदर्भात कारवाई करण्यात यावी याकरिता येथील कोळीवाडा परिसरातील लाभधारकांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले असून या निवेदनात तात्काळ अनुदान देण्यात आले नाही तर दि.१० आक्टोंबर २०२२ पासून पुर्णा नगर परिषदे समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी गोयल यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले आहे की सन २०१७ पासून घरकुलाचे प्रस्थाव प्रकल्प अधिकारी श्रीमती गाडेकर यांनी स्विकारले सन २०१८ ते २०१९ पर्यंत आर्थिक अनुदान मिळाले सन २०२०/२१ या कालावधी पर्यंत कोरोना महामारी मुळे योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे याच प्रकरणी नगर परिषद मधील योजनेचा सर्वे करणाऱ्या कुशाग्र एजंन्सी चालकांना या योजनेच्या अनुदान वाटप प्रकरणी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत असल्यामुळे योजनेतील लाभार्थी अक्षरशः त्रस्त झाले असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही नमूद करण्यात आले असून या योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान मिळाले नाही तर असंख्य अनुदाना पासून वंचित असलेले लाभार्थी नगर परिषदे समोर दि.१० आक्टोंबर २०२२ रोजी उपोषणास बसणार असल्याचेही म्हटले असून या निवेदनावर गिरिराम नागोराव सोळंके,पाराजी तुळशीराम घोरपडे,वच्छलाबाई विठ्ठलराव मेघमाळे,सुदाम दत्तराव जगताप,विश्वनाथ बापुराव लोंढे,राजकुमार पिराजी भंगे आदींच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या