💥गंगाखेड महसुल प्रशासनात कार्यरत मंडळ अधिकारी व तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!


💥शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता मोकळा करून देतो म्हणून मागितली होती १० हजार रुपयांची लाच💥


गंगाखेड (दि.१८ आक्टोंबर) - येथील तहसिलदार यांनी तक्रारदार पुरुष वय ५२ वर्षे यांना शेतात जाण्यासाठी असलेली वाट तात्काळ मोकळी करून देण्याचे आदेश दिल्यानंतर देखील तहसिलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करून तक्रारदारास सदर रस्ता मोकळा करून देण्याच्या कामासाठी महसुल प्रशासनात कार्यरत मंडळ अधिकारी (वर्ग-3) संजय लक्ष्मणराव काकडे व तलाठी (वर्ग-3) रमेश दत्तराव भराड यांनी तक्रारदार यांना दि.१७ आक्टोंबर २०२२ रोजी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली या संदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक या लाच मागणी प्रकरणाची पडताळणी त्याच दिवशी दि.१७ आक्टोंबर २०२२ रोजी केली असता त्यात सत्यता आढळून आल्यानंतर सापळा कारवाई करण्यात आली यावेळी मंडळ अधिकारी काकडे यांच्या सांगण्यावरून १० हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना तलाठी रमेश भराड यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले.   

 या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की  यातील तक्रारदार यांच्या शेत गट १९८ मध्ये जाण्या येण्यासाठी गट क्र.१९८ व गट क्र.२०० मधुन सव्वा आठ फूट गाडी वाट रस्ता देण्यासाठी तहसीलदार गंगाखेड यांनी  दि.०१ जुलै २०२१ रोजी लेखी आदेश मंडळ अधिकारी गंगाखेड व तलाठी मालेवाडी यांना दिलेला होता. सदर रस्ता मोकळा करून देण्याच्या कामासाठी तक्रारदार यांच्या गंगाखेड येथील दवाखान्या मध्ये दोन्ही आरोपी लोकसेवक हजर असताना दोन्ही आरोपी लोकसेवकांनी १० हजार रूपयांच्या  लाचेची मागणी करून लाचेची रक्कम १० हजार रूपये या घटनेतील आरोपी लोकसेवक मंडळ अधिकारी संजय काकडे यांनी स्वतः आरोपी लोकसेवक तलाठी रमेश भराड याच्याकडे देण्यास सांगितले वरून तलाठी भराड याने स्वतः१० हजार रूपये स्विकारले असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले.

    यातील नमूद दोन्ही  आलोसे  यांचे विरुद्ध पोस्टे गंगाखेड येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

➡  *मार्गदर्शक :-

डॉ. राजकुमार शिंदे

पोलीस अधीक्षक, 

ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड.

श्री. धरमसिंग चव्हाण

अपर पोलीस अधीक्षक,

ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड.

➡ *पर्यवेक्षण अधिकारी :-*

श्री. किरण बिडवे

पोलीस उप अधीक्षक,

ला.प्र.वि. परभणी

➡  *सापळा व तपास अधिकारी :-* 

श्री. बसवेश्वर जकीकोरे, 

पोलीस निरीक्षक,

ला.प्र.वि. परभणी

➡ *सापळा कारवाई पथक :-* 

 पोलीस हवालदार  हनुमंते, कटारे, निलपत्रेवार , पोशि शेख मुक्तार, अतुल कदम चालक कदम,ला.प्र.वि. युनिट परभणी

*परभणी  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*

डॉ.राजकुमार शिंदे

पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड.

मोबाईल नंबर - 9623999944.

श्री.किरण बिडवे

पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. परभणी.

मोबाईल नंबर - 7020224631

कार्यालय दुरध्वनी - 02452-22059

टोल फ्रि क्रं. 1064

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या