💥पुर्णेतील गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालयाचे प्रा.डॉ शिवसांब कापसे यांची संत नामदेव संशोधन साहित्य पुरस्कारासाठी निवड....!


💥त्यांनी साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान💥

पूर्णा: येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. शिवसांब कापसे यांची निवड संत नामदेव संशोधन समीक्षा साहित्य पुरस्कार 2022 करिता निवड करण्यात आली आहे त्यांनी साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या मराठी ग्रामीण साहित्य आणि प्रतिमा या ग्रंथाच्या उत्कृष्ट निर्मिती बद्दल राष्ट्रीय पातळीवरील संत नामदेव समीक्षा पुरस्कार 2022 जाहीर केल्याचे शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील मराठी विभाग प्रमुख डॉ श्रीराम कऱ्हाळे यांनी पत्र देऊन कळविले आहे . या पुरस्काराचे वितरण हे 22 नोव्हेंबर रोजी करण्यात  येणार असल्याचे कळविले आहे.


डॉ शिवसांब कापसे  हे श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे प्राध्यापक असून त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांना  यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला आहे  देशातील सुप्रसिद्ध असा संत नामदेव साहित्य पुरस्कार 2022 त्यांना जाहीर करून सन्मानित केले आहे त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ के. राजकुमार. उपप्राचार्य डॉ संजय दळवी,डॉ रवी बर्डे ,डॉ जितेंद्र पुल्ले ,डॉ विजय पवार,डॉ दिशा मोरे ,श्री बी पी कुलकर्णी पत्रकार श्री जगदीश जोगदंड आणि मित्रपरिवार यांनी  अभिनंदन केलेले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या