💥आज जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिन....!


💥संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर 'नैसर्गिक आपत्ती निवारण दिन' म्हणुन साजरा केला जातो💥

संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर 'नैसर्गिक आपत्ती निवारण दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो आपत्ती व्यवस्थापन धोरणात आमूलाग्र बदल करणारी ही संकल्पना स्वीकारणे अनेक देशांपुढे आव्हान ठरले.या संकल्पनेमुळे 'आपत्ती प्रतिसाद' पेक्षा 'आपत्ती आकुंचन' यास महत्त्व आले आपत्ती ओढवू नये तसेच आपत्तीमुळे होणारे परिणाम कमी करणे यासाठी उपाययोजना हा मुख्य केंद्रबिंदू ठरला. 

देशाच्या विकास आराखडा धोरणात व विकास नियमावलीत सुयोग्य बदल करणे ही उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरली.त्याच बरोबरीने सर्व विकासास मानवी चेहरा मिळाला कारण सजीव प्राणी व वनस्पती हे विकासाचे केंद्रबिंदू असावेत असे जागतिक धोरण ठरले आहे. 

२००५ मध्ये युनोच्या माध्यमातून 'ह्योगो कृती आकृतिबंध' ठरविण्यात आला.२००५ ते २०१५ या काळात युनोच्या सदस्य देशांनी सदर आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे मान्य केले.तो योग्यरीत्या अंमलात आणण्यासाठी प्रतिवर्षी एक उद्देश निश्चित करून त्यानंतर संपूर्ण वर्षभर त्या अनुषंगाने प्रत्येक राष्ट्रामध्ये विविध उप्रक्रम राबविण्यात येतात.यात समाज प्रबोधनावर भर देण्यात येतो. 

२००४ मध्ये 'आपत्तीतून निर्माण होऊ शकणारे भविष्यातली प्रश्न', २००६ मध्ये 'शालेय शिक्षणाद्वारे आपत्ती घटविण्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग' २००९ मध्ये' रुग्णालयांसाठी आपत्ती व्यवस्थापन' २०१० मध्ये 'आपले शहर आपत्ती पासून सुरक्षित' तर २०१२ मध्ये 'महिलाः आपत्ती आकुंचनातील संवेदनक्षम घटक' असे विविध उद्देश ठरविण्यात आले होते.


*संदर्भ : इंटरनेट*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या