💥ड्रॉप रोबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत परभणी जिल्हा मुलींचा संघ प्रथम क्रमांकावर....!


💥या स्पर्धेतील सर्वसाधारण विजेते पदासह चषक जिंकून तिन्ही प्रकारात मुलीने प्रथम क्रमांक पटकावला💥

परभणी (दि.०५ आक्टोंबर) - नांदगाव जि नाशिक येथे १२वी राज्यस्तरीय ज्युनियर ड्रॉप रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा दि.१ ते ३या कालावधीत पार पडली स्पर्धेतील एकेरी प्रकारात अश्विनी डुकरे हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त  केले तर दुहेरी प्रकारात   ज्ञानेश्वरी डुकरे अनुष्का लहाने  आणि दोघींनी प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त तर मिश्र दुहेरी प्रकारात अजय वराडे आणि हर्षदा शेळके ओमकार शेळके यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करुन सुवर्णपदक पटकावले तसेच या स्पर्धेतील सर्वसाधारण विजेते पदासह चषक जिंकून तिन्ही प्रकारात मुलीने प्रथम क्रमांक पटकावून परभणी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल भारतीय ड्रॉप रोबॉल महासंघाचे कोषाध्यक्ष दत्तागिरी गोसावी राज्याचे अध्यक्ष शैलेंद्र सोनजे  सचिव दिनेश अहिरे कोषाध्यक्ष विलास निरभवने तांत्रिक समितीचे प्रमुख प्रा. डॉ.मुरलीधर राठोड तसेच परभणी जिल्हा ड्रॉप रोबॉल  असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार सचिव सदाशिव बोबडे प्रसिद्धीप्रमुख शिवाजी बोबडे रामचंद्र डुकरे  प्रशिक्षक प्रवीण बद्दे प्रदीप राठोड  मुरलीधर शिंदे अनिल अवसरमले सौरभ दैठणकर आदींसह परभणी जिल्ह्यातील ड्रॉप रोबॉल प्रेमीने अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या