💥पुर्णा पंचायत समितीतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यालयाला दांडी...!


💥शेतकरी/कामगार हिताच्या शासकीय योजनांचा खेळखंडोबा💥 

पुर्णा (दि.२१ आक्टोंबर) - पुर्णा पंचायत समिती कार्यालयात 'अंधेर नगरी चौपटराज' असा कारभार झाल्याचे निदर्शनास येत असून शेतकरी/शेतमजूर कामगारांच्या अनेक शासकीय योजनांचा अक्षरशः खेळखंडोबा झाल्याचे निदर्शनास येत असून अनेक योजनांची अंमलबजावणी दलालांमार्फत होत असल्यामुळे 'शासकीय योजनांत मध्यस्थी दलाल भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी मालामाल अन् शासकीय योजनांचे लाभार्थी बेहाल' असा एकंदर कारभार चालत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

 पंचायत समिती कार्यालातील अनेक अधिकारी/कर्मचारी अक्षरशः उंटावरून शेळ्या हाकल्यागत कार्यालयात हजर न राहतात आपला कारभार कार्यालया बाहेरूनच दलालांमार्फत चालवत असल्याचे निदर्शनास येत असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागातीलम कर्मचारी तर सातत्याने कार्यालयात गैर हजर राहत असल्याचे निदर्शनास येत आहे महाराष्ट्र शासन सांगत की शेतकऱ्यांनी फळबाग वृक्ष,फुल शेती लागवड करावी त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदान सुध्दा दिलं जात परंतू ते शासकीय अनुदान शेतकऱ्याच्या पदरात संपूर्णपणे पडत की नाही ? याची दखल आजपर्यंत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतलेली नाही 

तालुक्यात वृक्ष लागवडीचा खर्च हा अधिकाऱ्यांनी दलाला मार्फत प्रचंड प्रमाणात केला असून संबंधित अधिकारी कार्यालयाला हजेरी न लावता घरी बसून दलालांमार्फत कामे करीत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे त्यामध्ये त्यांना १५ ते २० हजार रुपये शेतकऱ्यांकडून दलाल घेऊन देत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे त्यामुळे अनेक शासकीय योजना आपल्या पदरात पडाव्या या करीता गरजवंत शेतकरी कार्यालयात चक्करा मारून मारून आपली पादत्रान झिजवत असून बोगस लाभार्थी मात्र दलालांच्या मध्यस्थीने या शासकीय योजना कागदोपत्री लाटून आपले उक्कळ पांढरे करून घेत असल्याचा गंभीर प्रकार देखील घडल्याचे समोर येत आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या