💥परळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव व मशाल चिन्ह मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा....!


💥टावरला फोडले फटाके ; पेढे वाटून साजरा केला आनंद💥

परळी (दि.१० आक्टोंबर) - शिवसेनेचे नाव व चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आज निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यासोबत निवडणूक चिन्ह म्हणून मशाल निशाणी देण्यात आली आहे. आज या नव्या नाव व चिन्हाचा आनंदोत्सव शिवसेनेचे बिड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर व युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आज शिवसेना पक्षाला मिळालेल्या नव्या नावाचा व चिन्हाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी तर पेढे वाटून आंनदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना उपजिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर म्हणाले की, शिवसेना म्हणजे आग आणि आगच आहे, त्यातच आता मशाल चिन्ह मिळाल्यामुळे खोके जाळून टाकायचे आहेत आणि नव्याने कात टाकून नवा पक्ष नाव म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मना मनात रूजवायचे आहे. मशाल चिन्ह देवून निवडणूक आयोगाने आम्हाला अंधकार जाळून टाकण्याची आणि नव्याने महाराष्ट्र प्रकाशमय करण्याची संधी दिल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलतांना प्रा.अतुल दुबे यांनी सांगितले की, मुठभर लोकांमुळे मना मनात रूजलेले आमचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविले गेले. परंतू लक्षात घ्या आम्ही कट्टर शिवसैनिक असून हातात मशाल घेवून येणारी निवडणूक लढणार आहोत. मशालीच्या तीव्र आगीत बंड करणारे लोकप्रतिनिधी म्हणजेच गद्दार जळून खाक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेना बीड जिल्हा उप प्रमुख अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे, शिवसेना बीड जिल्हा सह संघटक रमेश चौडे, मा. उप शहर प्रमुख सतीश जगताप,मा.नगरसेवक दिलीप बद्दर, युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, जेष्ठ शिवसैनिक सुगंदचंद लोढा,शिवसेना उप शहर प्रमुख किशन बुंदेले,तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,छ.शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमणे,मा. शहर संघटक संजय कुकडे,शिवाजी नगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, विद्यार्थी सेना मा. तालुका समन्वयक अमित कचरे,मंगेश अवस्थी,प्रकाश देवकर,योगेश जाधव, सुरेश पवार, योगेश घेवारे, सचिन लोढा, बजरंग औटी आदींसह शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या