💥भगवान बुद्धांचा आत्त दिप भव: हा संदेश प्रत्येकाने प्रत्येकाने आचरणात आणावा....!

 


💥परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांचे प्रतिपादन💥


पूर्णा (दि.०५ आक्टोंबर) - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त पुर्णेतील बुद्ध विहार येथे आज बूधवार दि.०५ आक्टोंबर २०२२ रोजी भदंत डॉ.उप गुप्त महाथेरो भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सकाळी आठ वाजता डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी नऊ वाजताभारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


दहा वाजता बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी बुद्ध विहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले समता सैनिक दलाने याप्रसंगी मानवंदना दिली. दुपारी साडेबारा वाजता बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी त्रिरत्न वंदना व पूजापाठ घेण्यात आला प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत डॉ उप गुप्त महा थे रो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता दूरदृष्टी प्रत्येक धर्माचा तोलनिक अभ्यास 21 वर्षाच्या प्रदीर्घ गहन अध्ययनातून बुद्ध धम्माचा स्वीकार केला व आपल्या पाच लाख अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली.

धम्मदेशनेनंतर गंगाधर कांबळे बरबडीकर परिवाराकडून ची वरदान फलदां व खिरदान देण्यात आले.बुद्ध विहारा पासून महामानव तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची वाद्य वृंदासह भव्य रॅली काढण्यात आली मोठा जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला होता.रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाहीर सभेमध्ये झाला.

सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव  नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे सह्यायक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुप्रसिद्ध कवी लेखक नारायणराव जाधव आदींची उपस्थिती होती.आपल्या प्रमुख भाषणामध्ये परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर यथोचित  प्रकाश टाकला.

भगवान बुद्धांचा दिव्य संदेश आ त दीप भव अर्थात स्वयंप्रकाशित व्हा हा प्रत्येकाने आचरणात आणल्यास संपूर्ण मानव जातीचे कल्याण या माध्यमातून होऊ शकते.मुख्याधिकारी अजय नरळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित केले.भदंत पयावंश यांनी आपल्या धम्मदेशनेमध्ये धम्मा मधील प्रज्ञा शील करुणा मंगल मैत्री आचरणात आणून आदर्श बौद्ध उपासक उपासिका बनण्याचे आवाहन केले.शाहीर विजय सातोरे यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधन गीताचे गायन व स्वागत गीत सादर केले.

प्रमुख उपस्थितीतीमध्ये माजी उपनगराध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे ज्येष्ठ नगरसेवक अनिल खरगखराटे मधुकर गायकवाड दादाराव पंडित एडवोकेट धम्मदीप जोंधळे एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड माजी नगरसेवक अशोक धबाले यादवराव भवरे प्राचार्य राम धबाले पत्रकार विजय बगाटे  राजा रणवीर पी.जी रणवीर दिलीप गायकवाड शिवाजी थोरात वारा काळे नागेश येंग डे साहेबराव सोनवणे मुकुंद पाटील भारतीय बौद्ध महासभेचे श्यामराव जोगदंड ज्ञानोबा जोंधळे गंगाधर खरे श्रावण यंग डे मुंजाजी गायकवाड बाबाराव वाघमारे बौद्धाचार्य तुकाराम तुकाराम ढगे अतुल गवळी किशोर ढाकरगे बौद्धाचार्य उमेश बाराटे अमृत कऱ्हाळे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल धबाले राम भालेराव सुरज जोंधळे प्रकाश जगताप नितीन सोनुले आदींनी परिश्रम घेतले.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या